बारामती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड
'या निवडीमुळे बारामतीमधील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला नवी ऊर्जा मिळेल,

बारामती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड
‘या निवडीमुळे बारामतीमधील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला नवी ऊर्जा मिळेल,
बारामती वार्तापत्र
बारामती येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात पार पडली. मावळते अध्यक्ष रंगनाथ नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
या निवडीमध्ये विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अॅड. विजयकुमार बर्गे उपाध्यक्षपदी अॅड. जी बी आण्णा गावडे, सचिव राहुल केदारी, कार्याध्यक्ष विपुल पाटील, कायदेशीर सल्लागार अॅड. अशोक पाटील व महिला प्रतिनिधी ॲड. मोनिका पाटील यांची निवड करण्यात आली नवीन कार्यकारिणी सदस्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ॲड. विजयकुमार बर्गे यांनी ‘समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विविध उपक्रम, व युवक प्रशिक्षण शिबिर राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
‘या निवडीमुळे बारामतीमधील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला नवी ऊर्जा मिळेल,’ असा विश्वास प्राध्यापक ज्ञानदेव सरवदे यांनी व्यक्त केला.
या बैठकीचे प्रास्ताविक हरिभाऊ हिंगसे यांनी केले तर तुकाराम कांबळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा निवड समितीचे बाळकृष्ण भापकर, तसेच बारामती शाखेचे दादासाहेब कोळी, राजेश पडकर, आण्णा जाधव इत्यादी उपस्थित होते.