सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

बारामती वार्तापत्र

भारताचे पहिले गृहमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि:३१ रोजी त्यांना प्रशासनाकडून पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला अखंड, एकसंध, मजबूत राष्ट्र बनविण्यासाठी सरदार पटेलांनी केलेलं कार्य अलौकिक असून त्यासाठी ते सदैव स्मरणात राहील. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पावधीतंच साडेपाचशेहून अधिक संस्थानांचं भारतात विलिनीकरण करुन त्यांनी अखंड, मजबूत, एकसंध देशाच्या निर्मितीचा पाया भक्कम केला. तर माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी अमूल्य योगदान दिलं. पाकिस्तानची फाळणी करुन बांग्लादेशची निर्मिती, आशियाई खेळांचं यशस्वी आयोजन, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वं करताना इंदिराजींनी दूरदृष्टी, राजकीय कौशल्याचं दर्शन घडवलं.असे मत निवासी नायब तहसिलदार यांनी व्यक्त केले.

यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, महसूल सहायक देस्तेवाड, भाऊसाहेब सोनवले व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button