बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न
“जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया”

बारामती आगारात चालक दिन व राष्ट्रीय प्रवासी दिन संपन्न
“जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया”
बारामती वार्तापत्र
बारामती आगार, प्रादेशिक परिवहन विभाग बारामती व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी प्रवासी दिन व चालक दिन बारामती एस.टी. आगार आयोजित करण्यात आला.
यावेळी विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक रविराज घोगरे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, बारामती बस स्थानक प्रमुख घनश्याम शिंदे,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरज पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विना अपघात सुरक्षित वाहतूक सेवा देणाऱ्या चालकांचा प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रवासी दिनानिमित्त चालक, वाहक व प्रवाशांना गुलाबपुष्प व पाणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच दिलीप सरोदे (सफाईगार) यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “जागरूक ग्राहक बनूया, वाहतुकीचे नियम पाळूया” या संदेशावर आधारित पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
श्री. पाटील यांनी प्रवासादरम्यान वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, अतिवेग व बेदरकार वाहनचालना टाळणे याबाबत माहिती दिली. तसेच ‘राहवीर योजना’ याबाबतही मार्गदर्शन केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संजीव बोराटे व महेश पवार यांनी प्रवाशांचे हक्क, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे स्वरूप व ग्राहक संरक्षण कायदा याविषयी माहिती दिली.
बारामती विभागीय यंत्र अभियंता (चा.) पांडुरंग वाघमोडे व बारामती आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी स्थानकातील सुरक्षा, सुविधा व बस वाहतुकीबाबत सविस्तर माहिती दिली.






