जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात ३५६ केसेस करून ७३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.
अशी माहिती नारायण शिरगावकर,पोलीस उपअधीक्षक, बारामती. यांनी दिली.

जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात ३५६ केसेस करून ७३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.
अशी माहिती नारायण शिरगावकर,पोलीस उपअधीक्षक, बारामती. यांनी दिली.
बारामती वार्तापत्र
दिनांक ०९ सप्टेंबर २०२० रोजी जनता कर्फ्यु काळामध्ये बारामती शहर व ग्रामीण भागात रस्त्यावर विनाकारण फिरणारे ,मास्क न घालता फिरणारे तसेच मो.वाहन अधिनियम यांचे उल्लंघन करणारे लोकांवर पोलिसांनी ३५६ केसेस करून ७३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.
तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती मार्फ़त पेन्सिल सर्कल, सिटी इन पॉइंट, सांगवी, माळेगाव या भागात प्रवासी/खाजगी वाहतुक- १७ गुन्हे दाखल करून एकुण पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
(बारामती पोलीस विभागाने जनता कर्फ्युच्या आता पर्यन्तच्या ३ दिवसाच्या कालावधीत १३६७ केसेस करण्यात आल्या असून २ लाख ९६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांनी ५८ केसेस दाखल करून १ लाख ७६ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.)
अशा कारवाई करण्यात आल्या असून अधिक कारवाई करण्यात येणार आहे . नागरिकांनी घरी रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे.
आपला,
अशी माहिती नारायण शिरगावकर,पोलीस उपअधीक्षक, बारामती. यांनी दिली.