इंदापूर
हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांचे केले तोंडभरून कौतुक

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांचे केले तोंडभरून कौतुक
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील शैलेश देवराव मोरे, दिपाली शिवाजी धालपे, चेतन अनिल ढावरे, अशोक बाळासाहेब नरूटे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रामाणिक व कर्तबगार पोलीस अधिकारी म्हणून आपण आपली व आपल्या तालुक्याची शान वाढवावी. आपल्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, कायदा व सुव्यवस्थेसाठी सर्वांना सोबत घेऊन आपण काम करावे, असे हर्षवर्धनजी पाटील सत्कार प्रसंगी म्हणाले.