इंदापूरातील ई मॅरेथॉन स्पर्धेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे धावले
स्पर्धेत अनेक युवक युवतींचा सहभाग

इंदापूरातील ई मॅरेथॉन स्पर्धेत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे धावले
स्पर्धेत अनेक युवक युवतींचा सहभाग
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ तसेच पुणे येथील शिवायडीऐ सामाजिक संस्था,यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ई- मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन,सार्वजनिक बांधकाम,पशुसंवर्धन,दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विरसिंह रणसिंग,तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले,सीवाय आयडी संस्थेचे संचालक प्रवीण जाधव,पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे, कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,उपाध्यक्ष संदीप सुतार,जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,तालुका संघटक भिमराव आरडे,उदयसिंग जाधव देशमुख,शिवकुमार गुणवरे,रामदास पवार,लक्ष्मण सांगवे,बाळासाहेब कवळे,भीमसेन उबाळे,प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे,शिवसेना इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी,माथाडी कामगार सेनेचे दूर्वास शेवाळे, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ,कुस्ती कोच मारुती मारकड,शिवधर्म फाऊंडेशनचे अण्णासाहेब काटे, बाळासाहेब ढवळे,दत्तात्रय व्यवहारे,विनायक वाघमारे, अँड.आशुतोष भोसले,अरबाज शेख,भाऊराव झेंडे, प्राध्यापक सुनील मोहिते यांच्यासह जिल्हा पातळीवर राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.