स्थानिक

बारामती आरटीओ ने दिली खाजगी बसेस ट्रॅव्हल्स यांना प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे होत होते हाल

बारामती आरटीओ ने दिली खाजगी बसेस ट्रॅव्हल्स यांना प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे होत होते हाल

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची होणारी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी बारामती आरटीओ कार्यालय यांनी व्यंकटेश टूर्स अँड ट्रॅव्हल्सला बारामती पुणे प्रवाशी वाहतूक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.तसेच सर्व खाजगी प्रवाशी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संपमागे घेईपर्यंत मान्यता दिली आहे.

या संदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बारामती कार्यक्षेत्रातील प्रवाशांना खाजगी बस सेवा उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, वाहतूक पोलीस, पीएमपीएमएल व खाजगी बस वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून बारामती शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे आज सकाळी 6 वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारुन कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

आज सकाळपासून 120 प्रवाशांना ही सेवा बारामती मधून उपलब्ध करून दिले असल्याचे बारामतीचे डेपो मॅनेजर अमोल गोंजारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram