बारामती आर टी ओ चे अँब्युलन्स धारकांना आवाहन..
पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णवाहिका दरपत्रक पुनर्विलोकन व दरनिश्चिती करणेबाबत.

बारामती आर टी ओ चे अँब्युलन्स धारकांना आवाहन..राजेंद्र केसकर..
सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी
पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णवाहिका दरपत्रक पुनर्विलोकन व दरनिश्चिती करणेबाबत.
बारामती वार्तापत्र
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे यांच्या महाराष्ट्र मोटार वाहने नियम, १९८९ मधील नियम ६२(३) च्या तरतूदीतील ‘परिचलन पध्दतीनुसार’ सोबतच्या सूचीमधील विषय क्रमांक (१) प्रमाणे पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णवाहिका दरपत्रक पुनर्विलोकन व दरनिश्चिती करणेबाबतचा सुधारित प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.
परिचलन पद्धतीनुसार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती यांची संयुक्त बैठक
मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 62(3) मधील तरतुदीनुसार परिचलन पद्धतीने ठराव सादर करणे,
कोविड 19 च्या अनुषंगाने प्रसार रोखणे व प्रतिबंधात्मक उपाय योजनांकरिता, वायूवेग पथकामार्फत, रुग्णवाहिका मागणी नुसार तात्काळ अधिग्रहण करून उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. रुग्णवाहिका सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना प्राप्त आहेत. रुग्णवाहिकांचे आवश्यकतेनुसार तात्काळ अधिग्रहण करून रुग्णवाहिका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताब्यात देण्यात येत आहेत. पुणे कार्यालयाने रुग्णवाहिका मालकांना नोटिस जारी केल्या आहेत. रुग्णवाहिका अधिग्रहीत करून महानगरपालिका यांचेकडे सुपूर्द केल्या आहेत.
सदयस्थितीत लागु असलेले दर हे दिनांक 14.05.2020 रोजी खालीलप्रमाणे सुधारित करण्यात आले होते. सदर दर हे किलोमिटर व तासांकरीता आहेत.
सद्यस्थितीत रुग्णवाहिका पूर्णवळ आवश्यक असल्याने मोटार वाहन विभाग पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्रमांक मोवावि/1447 दिनांक 31.07.2020 मध्ये खाजगी रुग्णवाहिकेचा इंधन, वाहन चालक, देखभाल दुरुस्ती खर्च पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आला असून फक्त खाजगी रुग्णवाहिकेला भाडेपोटी प्रतिदिन किंवा प्रतिमहिना किती रक्कम द्यावी याबाबतचा दर निश्चित करून मिळण्याची विनंती केली आहे.
पुणे महानगरपालिकेकडे अधिग्रहीत करून दिलेल्या सर्व रुग्णवाहिका या 24 तास त्यांचेच ताब्यात आहेत. त्यावर तीन पाळ्यांमध्ये चालक नियुक्त आहेत. इंधन व देखभाल दुरुस्ती ही महानगरपालिकेने केलेली आहे. वर नमुद केलेल्या तक्त्यानुसार देयके अदा करणेबाबत केलेला खर्च वजा करून उर्वरित रक्कम संबंधीत रुग्णवाहिका मालकास अदा करावी लागेल.
मा.अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल यांचे कक्षामध्ये दिनांक 04.08.2020 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिकेकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत त्यांनी खाजगी रुग्णवाहिकेला भाड्यापोटी प्रतिदिन किंवा प्रतिमहिना याप्रमाणे दर निश्चित करून देण्याबाबत मागणी केली.
दिनांक 07.09.2020 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यकारी अभियंता, मोटार वाहन विभाग पुणे महानगरपिालका व रुग्णवाहिका संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये प्राधिकरणाने दिनांक 14.05.2020 रोजी विहित केलेल्या दरांसोबत एक दिवस (24 तासांकरिता) भाडेदर निश्चित करून मिळावा अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार, रुग्णवाहिकांकरिता सविस्तर चर्चेअंती खालील प्रमाणे सुधारित प्रतिदिन (24 तास पूर्णवळ याप्रमाणे) खालीलप्रमाणे दर सुचित/ प्रस्तावित करण्यात येत आहेत.
लागू राहिल.अटी व शर्ती
1. वरील भाडे दर फक्त प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीच्या कार्यक्षेत्रामध्ये लागू आहेत.
2. वरील भाडे दर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासुन परतीच्या अंतरासाठी आहेत. परतीसाठी रकाना 4 नुसार भाडे
3. 25 कि.मी. च्या पुढे अंतर गेल्यास त्या मुळ भाड्यात प्रती की,मी. वाढवून एकुण भाडे ठरेल, (रकाना 4 चे अवलोकन करावे)
4. सदरचे दर पत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.
5. वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता वरील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे प्रतिक्षा दर लागू रहातील. (रकाना 5 चे अवलोकन करावे.)
6. प्रस्तावित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.
7. रुग्णवाहिकेला GPS प्रणाली आसने आवश्यक राहिल,
६. प्रत्येक फेरी नंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
9. मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू रहातील.
10. सर्व रुग्ण वाहिका वातानुकुलीत असल्याचे ग्राहय आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार
11. खाजगी रुग्णवाहिकेचा पुर्णवेळ (24 तास) वापर महानगरपालिकेकडून करण्यात येईल व सदर रुग्णवाहिकेचे इंधन, वाहन चालक वेतन, देखभाल दुरुस्ती खर्च महानगरपालिकेकडून करण्यात येईल त्या सर्व रुग्णवाहिकाना रकाना 6 नुसार दर लागू राहतील.