बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करणार – पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल
खंडणी व गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने दिलेल्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करणार – पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल
खंडणी व गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन
बारामती वार्तापत्र
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनने मांडलेल्या प्रस्तावांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिले. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर परिसरातील उद्योजकांच्या बैठकीत बर्हाणपूर पोलीस उपमुख्यालयात त्यांनी हे वक्तव्य केले.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, कार्यकारणी सदस्य संभाजी माने, हरिश्चंद्र खाडे, उद्योजक राजाराम सातपुते, राजेंद्र पवार, अविनाश सावंत, अरुण म्हसवडे, विवेक सातपुते, शिवराज जामदार, रियल डेअरीचे मनोज तुपे, पियाजोचे चंद्रकांत काळे, किर्लोस्करचे विशाल शिंदे, डायनामिक्सचे मुकेश चव्हाण यांनी या बैठकीत सहभागी होऊन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक प्रस्ताव उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडले.
एमआयडीसीत नवीन पार्किंग झोन, पेन्सिल चौकात सिग्नल यंत्रणा, स्पीड ब्रेकर्स, रंबलर्स, ब्लिंकर्स, पोलीस चौकी, चोरींना आळा, भंगारवाल्यांची नोंद, सीसीटीव्हीची व्याप्ती, कामगारांची पडताळणी, महिला कामगारांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त, सूचनापेटी, गस्त वाढवणे, स्वतंत्र पार्किंग, उद्योग संवाद कक्ष असे प्रस्ताव मांडले.
पोलीस अधीक्षक गिल यांनी खंडणी व गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले. उद्योजकांनी निर्भयपणे गुन्हे नोंदवावेत, असे आवाहन त्यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक बिरादार आणि डॉ. राठोड यांनीही सहकार्याचे आश्वासन दिले. बैठकीनंतर आषाढी वारीत सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व कंपन्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.