बारामती औद्योगिक वसाहत मध्ये क्षयरोग तपासणी
टीबी बरा होऊ शकतो घाबरू नका वेळीच डॉक्टर यांना दाखवा व उपचार घ्या

बारामती औद्योगिक वसाहत मध्ये क्षयरोग तपासणी
टीबी बरा होऊ शकतो घाबरू नका वेळीच डॉक्टर यांना दाखवा व उपचार घ्या
बारामती वार्तापत्र
राष्ट्रीय क्षयरोग मुक्त कार्यक्रमांतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने टीबी मुक्त भारत अभियान साठी बारामती औद्योगिक वसाहत येथील कामगारांची मोफत तपासणी व छातीचा एक्सरे काढण्याचा उपक्रम रविवार दि.२३ मार्च रोजी संपन्न झाला.
या प्रसंगी बारामती औद्योगिक वसाहत चेअरमन रणजीत पवार व्हा. चेअरमन मनोज पोतेकर, सचिव रोहिदास हिरवे, उद्योजक अविनाश लगड, व्यवस्थापक राजेंद्र वाबळे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ शशिकांत येळे, टीबी निरीक्षक महादेव मोहिते आशा स्वयंसेविका व उद्योजक उपस्तीत होते.
औद्योगिक वसाहत मधील विविध कंपन्या मधील कामगार यांची तपासणी करून व एक्सरे काढुन , वेळेत उपचार करा पौष्टिक अन्न खा टीबीची लागण झाली असल्यास त्वरित उपचार घ्या,टीबी बरा होऊ शकतो घाबरू नका वेळीच डॉक्टर यांना दाखवा व उपचार घ्या आदी माहिती देण्यात आली.