स्थानिक

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीतून प्रथमच प्रायोगीक तत्वावर लंडन येथे समुद्रमार्गे १६ टन आंबा निर्यात.

९ जुन रोजी प्रथमच प्रायोगीक तत्वावर लंडन येथे समुद्रमार्गे १६ टनआंबा निर्यात झाला.

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीतून प्रथमच प्रायोगीक तत्वावर लंडन येथे समुद्रमार्गे १६ टन आंबा निर्यात.

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार येथील द्राक्ष व डाळींब निर्यात केंद्रातुन ९ जुन रोजी प्रथमच प्रायोगीक तत्वावर लंडन येथे समुद्रमार्गे १६ टनआंबा निर्यात झाला . याप्रसंगी समितीचे सभापती , अनिल खलाटे , सचिव अरविंद जगताप , सौ.भोईटे काकी आणि निर्यातदार अभिजीत भसाळे व चंद्रकांत भसाळे हे अग्रगण्य उपस्थित होते .

भारतातील एक अग्रगण्य आंबा निर्यातदार रेम्बो इंटरनॅशनल हे २०१५ पासुन बाजार समिती कडिल निर्यात केंद्रातुन जगभरातील १७ देशामध्ये त्या त्या देशातील कसोट्यानुसार आंबा निर्यात करत आहेत.करोना आपत्तीच्या कठीण काळात अनेक आव्हानांचा सामना करत दि.२५ / ४ / २०२० पासुन आजपर्यंत त्यांनी इंग्लड , स्विझरलँड , जर्मनी या देशामध्ये हवाई मार्गे २४० टन व आज प्रथमच समुद्रामार्ग १६ टन आंबा निर्यात करण्यात यश आल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत भसाळे यांनी कंटेनर निर्यात प्रसंगी मत व्यक्त केले . २१ दिवसाच्या सागरी प्रवासानंतर दि .३ जुलै २०२० रोजी आंबा इंग्लंड येथील फेलीक्सस्टोव्ह बंदरात पोहचेल , सागरी वाहतुकीसाठी जगभरातील प्रसिध्द मर्क्स या कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने नियंत्रित वातावरणाच्या कंटेनरने हा आंबा निर्यात होत आहे . हा प्रयोगा यशस्वी झाल्यास पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात कोकणातील हापुस व पुणे , सोलापुर , सांगली व मराठवाड भागातील केशर आंबा परदेशात निर्यात करता येईल . हवाई निर्यातीच्या खर्चाच्या मानाने सुमद्रामार्गे निर्यात ही स्वस्त असल्याने युरोपमधील ग्राहकांना वाजवी दरात आंबा पुरवणे शक्य होणार आहे . त्यामुळे ग्राहक आणख वाढतील अशी अपेक्षा सभापती अनिल खलाटे यांनी व्यक्त केली . यावर्षी हवाई मार्गाची उपलब्धता अत्यल्प नसल्याने तसेच हवाई वाहतुक दर जादा असल्याने अनेक देशात आंबा निर्यात होवु शकली नाही . रेम्ब इंटरनॅशनलच्या ६० टक्के वाटा हा अमेरीकेतील निर्यातीचा असतो मात्र करोना आपत्तीमुळे हा व्यवसाय हो शकला नाही . अभिजित भसाळे यांचा या संकटावर मात करुन संधी शोधुन युरोपीय देशात सागरी मार्गान आंबा निर्यात करण्याचा धाडसी प्रयत्न अभिनंदनीय आहे.असे मत कंटेनरती पुजा करुन झेंडा दाखवता सभापती अनिल खलाटे यांनी व्यक्त केले.पणन मंडळाने निर्माण केलेल्या निर्यात केंद्र चालवणेस बारामत मार्केट कमिटीला दिल्याने मार्केट कमिटीने निर्यात दारांची सोय केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कार्यक्रमानंत आभार सचिव अरविंद जगताप यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram