बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सुविधा पुरविणेचा संस्थेचा सतत प्रयत्न
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा ८९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सुविधा पुरविणेचा संस्थेचा सतत प्रयत्न
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचा १६ डिंसेबर २०२४ रोजी ८९ वा वर्धापन दिन किरण तावरे, बाळासाहेब गवारे यांचे शुभहस्ते उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सभापती, संचालक व सचिव तसेच व्यापारी वर्ग आणि सेवक यांचे उपस्थितीत गणपती आरती घेऊन केक कापणेत आला. बारामती बाजार समितीची स्थापना दि. १६/१२/१९३५ रोजी झाली असुन आजवर या संस्थेचे कामकाज पारदर्शक असुन शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या संस्थेवर मला एका शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असुन ही सभापती म्हणुन काम करणेची संधी मिळाली. यापुढे शेतकरी, आडते, खरेदीदार, हमाल-मापाडी व श्रमजिवी घटकांसाठी संस्था सतत कटिबद्ध आहे व राहील आणि शेतकरी हिताचे काम करीत राहु असे मत यावेळी सभापती सुनिल पवार यांनी व्यक्त केले.
बारामती मुख्य आवार तसेच जळोची व सुपे उपबाजार आवारात संस्थेने विविध सोई-सुविधा पुरविलेल्या असुन त्याचा फायदा शेतमाल खरेदी विक्री साठी होत आहे.
तसेच नवीन उपबाजारासाठी सुपे व झारगडवाडी येथे समितीने खरेदी केलेल्या जागेत भविष्यात शेतमाल खरेदी विक्रीची सुविधा निर्माण करणेचा समितीचा मानस आहे. समितीने आवारात आधुनिक धान्य ग्रेडींग युनिट, गांडुळ खत प्रकल्प, गोदाम, रेशीम कोष मार्केट, ई-नाम प्रणाली, इलेक्ट्रॉनिक भुईकाटा, गुळ सेलहॉल, फळे व भाजीपाला विक्री करिता सेलहॉल, जनावरे बाजार, आंबा निर्यात सुविधा केंद्र, पेट्रोल पंप इत्यादी सुविधा उभारलेल्या असल्याने बारामती बाजार समितीस गुणांकन पद्धतीत राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.
आता जळोची उपबाजार येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राची उभारणी केली असुन त्यामध्ये प्रति १०० मे. टनाचे सात कोल्ड स्टोरेज, प्रति १० मे. टनाचे तीन प्रिकुलींग युनिट, ब्लास्ट फ्रिजर, फ्रोजन फ्रुट, पॅक हाऊस, डिसपॅच एरिया, केळी ग्रेडींग, डाळींबाची ज्युस लाईन व एरीयल लाईन इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अशा प्रकारच्या सुविधा पुरविणेचा संस्थेचा सतत प्रयत्न असुन भविष्यात ही समिती शेतकरी हिताचे काम करणेस कटिबद्ध राहील.
यावेळी बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, इतर व्यापारी, आडते तसेच हमाल मापाडी आणि समितीचे संचालक बापुराव कोकरे, सतिश जगताप, विनायक गावडे, दत्तात्रय तावरे, शुभम ठोंबरे, संतोष आटोळे हे उपस्थित होते. समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.