कोरोंना विशेष

बारामती कोरोना चा 19 वा बळी.

दरम्यान, काल घेण्यात आलेल्या ८० नमुन्यांपैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

बारामती कोरोना चा 19 वा बळी.

बारामती :वार्तापत्र

बारामती शहरातील कल्पवृक्ष सोसायटी, स्विमिंग टँक जवळ, रामचंद मुलुचंद सोसायटी,परिसरात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

काल रात्री उपचारादरम्यान या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे बारामतीतील कोरोना बळींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

दरम्यान, काल घेण्यात आलेल्या ८० नमुन्यांपैकी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत २१ जणांसह नव्याने घेतलेल्या ५६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

Back to top button