पळसदेव गावच्या विकासाला निधी कमी पडु देणार नाही- दत्तात्रय भरणे
▫️कोट्यावधी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी मानले नामदार भरणेंचे आभार▫️

पळसदेव गावच्या विकासाला निधी कमी पडु देणार नाही- दत्तात्रय भरणे
▫️कोट्यावधी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी मानले नामदार भरणेंचे आभार▫️
▫️उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सोनाली कुचेकर यांचाही सत्कार▫️
इंदापूर : प्रतिनिधी
पळसदेवकरांनी मला नेहमीच भरभक्कम पाठिंबा तसेच भरभरून आशीर्वाद दिले आहेत, त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा, कितीही निधी लागू द्या,पळसदेव गावच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही,हा विश्वास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.
पळसदेव गावच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यमंत्री भरणेंनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल भरणेवाडी येथे पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे यांच्यासह पळसदेव येथील असंख्य पदाधिकाऱ्यांनी भरणेंचा भव्य सत्कार केला,यावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते.याप्रसंगी पळसदेव गावच्या उपसरपंच पदी सोनाली मेघराज कुचेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,सरपंच सुजित मोरे,नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली कुचेकर,मेघराज कुचेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच असंख्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना भरणेंनी सांगितले की,पळसदेवकरांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस ला पाठबळ देण्याचे काम केले असून या गावाचे माझ्यावर विशेष प्रेम आहे,त्यामुळे पळसदेवसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तसेच भविष्यात देखील तुम्हाला कितीही निधी लागू द्या,कसलीही मदत लागु द्या, तुमचा हा “मामा” तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे सांगून आपल्या सर्वांचे असेच प्रेम,आशिर्वाद व भरभक्कम पाठिंबा माझ्या पाठीशी असू द्या अशी अपेक्षाही शेवटी त्यांनी व्यक्त केली.