स्थानिक

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघाचे ‘प्रतिनिधित्व बचाओ,लोकतंत्र बचाओ’ आंदोलन

नवीन कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघाचे ‘प्रतिनिधित्व बचाओ,लोकतंत्र बचाओ’ आंदोलन

नवीन कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध

बारामती वार्तापत्र

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या प्रोटान,राष्ट्रीय मूलनिवासी महिलासंघ,भारत मुक्ती मोर्चा बारामती यांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांना नायब तहसीलदार बारामती मा.भोसले यांच्या मार्फत संयुक्त निवेदन देण्यात आले . बहुजनांच्या संविधानिक हक्क- अधिकारा विरोधातील महाराष्ट्र शासनाच्या धोरणांच्या आणि शासन निर्णय यांच्याविरोधात – प्रतिनिधित्व ( आरक्षण ) बचाओ , लोकतंत्र बचाओ ” आंदोलनाबाबत निवेदन देण्यात आले .

अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , भटके – विमुक्तव विशेष मागास प्रवर्गातील तसेच इतर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण मिळावे , भरतीसाठीची बिंदुनामावली अद्ययावत करावी , विविध क्षेत्रातील रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी , जुनी पेन्शन योजना चालू करावी , सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करू नये , नवीन कामगार विरोधी व शेतकरी विरोधी कायद्याचा निषेध करणे , मराठा समाजाला संविधानिक आरक्षण द्यावे , शिक्षण सेवकांना व अंगणवाडी सेविकांना नियमित वेतनश्रेणी द्यावी , असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी व लॉक डाऊन काळात त्यांना अर्थसहाय्य द्यावे , कंत्राटी पद्धती बंद करावी या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले . यावेळी डॉ . अरुण कांबळे अध्यक्ष प्रोटान पुणे जिल्हा , उषा धोरात प्रभारी राष्ट्रीय मूलनिवासी महिलासंघ , ॲड.सुशील अहिवळे अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा , पूजा लोठे उपाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा , विनोद मोरे मा अध्यक्ष , तंटामुक्ती समिती अंजनगाव ,सस्ते साहेब मोरे सरहे यावेळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!