कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग
पुण्यात मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली

कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग
पुण्यात मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली
पुणे : बारामती वार्तापत्र
पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला (Serum Institute Building) भीषण आग लागली आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारत आहे. कोव्हिशील्ड (Covishield Vaccine) या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून दोन तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली. दोन वाजून 37 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली. जवानांकडून तिघा कामगारांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे. सुदैवाने कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
नव्या बिल्डिंगमध्ये BCG लसीचं काम
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.