बारामती जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
महिलांच्या विविध समस्यांबाबत सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन

बारामती जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद
महिलांच्या विविध समस्यांबाबत सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये शेकडो महिलांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करत आरोग्य शिबिराचे उदघाटन झाले.
यावेळी डॉ.अंजली खाडे,डॉ.रेश्मा सरतापे आणि रसिका अहिवळे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या आरोग्य शिबिरामध्ये बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ.सौ.अंजली खाडे (एम.डी.मेडिसिन) आणि डॉ.रेश्मा सरतापे (बी.ए.एम.एस) यांनी उपस्थित महिलांची तपासणी करून आरोग्याच्यादृष्टीने घ्यावयाची काळजी आणि महिलांच्या विविध समस्यांबाबत सखोल आणि विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.निलम अहिवळे,सूत्रसंचालन प्रा.सेजल अहिवळे तर आभारप्रदर्शन प्रा.शिल्पा घोडके यांनी केले.
दरम्यान,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वासंती अहिवळे,प्रगती अहिवळे,पूजा लोंढे,प्रतिज्ञा चव्हाण,सारिका गव्हाळे,सौरवी अहिवळे, राजश्री अहिवळे,भावना अहिवळे यांनी परिश्रम घेतेले.तर गणेश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट,समर्थ लॅब्रॉटरी,जी.एन.एस लॅब्रॉटरी,घोडके रुग्णवाहिका यांनी विशेष सहकार्य केले.