स्थानिक

बारामती जेजुरी रस्त्यावर भीषण अपघात;अपघातात ७ जणांच मृत्यू

७ जण ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी

बारामती जेजुरी रस्त्यावर भीषण अपघात;अपघातात ७ जणांच मृत्यू

७ जण ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी

बारामती वार्तापत्र 

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोरील ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला स्वीप्ट डिझायरने दिलेल्या धडकेत एका महिलेसह ७ जणांचा जागीच मृत्यू झाला.

तर चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री सव्वासातच्या सुमारास घडली.

जेजुरी मोरगाव रस्त्यावरील एका कंपनी समोर रात्री सव्वा ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघात एवढा भीषण होता की ७ जण ठार झाले असून ५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (क्र. एम एच ४२ ए एक्स १०६०) जेजुरीकडून मोरगावकडे जात असताना श्रीराम ढाब्यासमोर पिकअप टेम्पोला ( क्र. एम एच १२ एक्स एम ३६९४ ) मधील साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली. येथील रस्त्यावरील एका कंपनी समोरील हॉटेल श्रीराममध्ये पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते.

त्यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील पाच जण तर पिकअपमध्ये असलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातामध्ये कारचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत असून त्यावरुन, भीषण अपघाताची दाहकता लक्षात येईल.

सोमनाथ रामचंद्र बायसे (२१), रामू संजीवन यादव, दोघेही रा नाझरेकप ता.पुरंदर जि.पुणे, अजयकुमार चव्हाण, रा. उत्तर प्रदेश, अजित अशोक जाधव, रा.कांजळे, ता. भोर, पुणे, किरण भारत राऊत रा. पवारबाकी ता. इंदापूर, पुणे, अश्विनी संतोष येसार, रा. नागणसूर हैद्रे सोलापूर, अक्षय शंकर राऊत, रा. झारगडवाडी ता. बारामती, पुणे अशी अपघातील मृतांची नावे आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून मृतांचे पार्थिक शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button