बारामती ट्रॅफिकची शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अचानक बदली की राजकारण?
जिल्ह्यातील १६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

बारामती ट्रॅफिकची शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची अचानक बदली की राजकारण?
जिल्ह्यातील १६ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
बारामती वार्तापत्र
जिल्हा पोलिस दलातील ११ पोलिस निरीक्षकांच्या पोलिस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बदल्या केल्या.पाच सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्याही बदल्या कऱण्यात आल्या. बहुचर्चित बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांची वर्षभरातच बदली करण्यात आली आहे.
बारामती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तेथे नेमणूक कऱण्यात आली आहे. बारामती मध्ये चंद्रशेखर यादव हे वाहतूक निरीक्षक म्हणून काम पाहत होते.चंद्रशेखर यादव यांची बारामती मध्ये डंपरचे वाढत चाललेले अपघात ट्राफिकची समस्या सातत्याने होणारे अपघात याबाबत तोडगा काढणे व तत्काळ कारवाई करणे ही चंद्रशेखर यादव यांची कामगिरी चांगली होती.त्यांच्यासारखी कामगिरी आता ज्यांची नेमणूक झाली त्यांना पेलावणार का हे देखील पहावे लागणार आहे.
चंद्रशेखर यादव यांची कामगिरी पाहता वरिष्ठांना काही राजकीय पुढारी व पत्रकारांनी बारामती शहरात बढती देण्याबाबत कळविले होते.कारण की बारामती शहरामध्ये पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कुरघोडीमुळे त्यांची बढती होणे जरुरीचे असल्याची बारामती शहरामध्ये चर्चा आहे?
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी बुधवारी (दि. ८) रात्री उशीरा बदल्यांचे आदेश जारी केले. अन्य पोलिस निरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणे – (कोठून कुठे) : कुमार रामचंद्र कदम (वडगाव मावळ ते सासवड), सचिन दत्तात्रय वांगडे (हवेली ते उरुळी कांचन), रवींद्र दत्तात्रय पाटील (कामशेत ते नियंत्रण कक्ष), सपोनि महादेव चंद्रकांत शेलार (नारायणगाव ते स्थानिक गुन्हे शाखा), अभिजित सुभाष देशमुख (परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ), वैशाली रावसाहेब पाटील (बारामती तालुका ते हवेली), शंकर मनोहर पाटील (उरुळीकांचन ते कामशेत), चंद्रशेखर मोहनराव यादव (बारामती वाहतूक ते बारामती तालुका), श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी (नियंत्रण कक्ष ते बारामती वाहतूक), ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी (सासवड ते नियंत्रण कक्ष), सपोनि नितीन हनुमंत खामगळ (वेल्हा ते नियंत्रण कक्ष). सपोनि प्रवीण महादेव सपांगे (यवत ते नारायणगाव), किशोर विठ्ठल शेवते (वाचक अपोअ, पुणे ते वेल्हा), सपोनि गजानन रतन चेके (वाचक उविपोअ बारामती ते नियोजित पोलिस ठाणे निरा-नृसिंहपूर).
चौकट
बारामती तालुका पोलिस ठाण्यात नुकतीच झालेली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आणि अन्य प्रकरणांमुळे पोलिस निरीक्षक वैशाली पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती.जिल्हा पोलिस अधिक्षकांनी त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांना खुलासा सादर कऱण्याचेही नुकतेच आदेश दिले होते.
त्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा होती,ती अखेर खरी ठरली.जिल्हा पोलिस आधीक्षकांच्या आदेशानंतर चंद्रशेखर यादव यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे.तर बारामती वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी श्रीशैल चिवडशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच वैशाली पाटील यांना हवेली पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.बारामती तालुका पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून बारामती एमआयडीसीचाही यात समावेश आहे.त्यामुळे स्थानिक गुन्हेगारी रोखण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कसब प्रभारी अधिकाऱ्यांमध्ये असणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर बारामतीच्या वाहतूक शाखेत उत्तम कामगिरी केलेल्या चंद्रशेखर यादव यांच्याकडे बारामती तालुका पोलिस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे आता ते या पोलिस ठाण्याच्या कारभारात कशा पद्धतीने सुसूत्रता आणि पारदर्शकता आणतात हे पाहणे महत्वाचे आहे.