बारामती ट्रेकर्स क्लब चा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
विविध उपक्रम आणि आणि पुरस्कार वितरण..
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला तरी अंगात संचार निर्माण होतो अशा छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे… आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे आपलं नशीब आहे. म्हूणन महाराष्ट्राच्या मातीत असलेली प्रचंड ऊर्जास्रोत म्हणजे गडकोट किल्ले यांना भेटी देऊन भव्य इतिहास डोळ्यात साठवला पाहिजे असे प्रतिपादन बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष जय पाटील यांनी बारामती ट्रेकर्स च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी केले आहे.
गतवर्षी बारामती तालुक्यातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या बारामती ट्रेकर्स क्लब चा आज वर्धापन दिन उत्साहात पार पडला. या प्रसंगी कॅनॉल मध्ये वाहून जाणाऱ्या दोन महिलांना जीवदान देणाऱ्या सूरज चोपडे यास शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या वेळी जीवनातील स्वतःसाठी दिलेला वेळ हीच मोठी कमाई आहे. वाचन, कविता आणि दुर्गभ्रमंती ही माणसाला मानसिक तणावातून बाहेर काढत असते. उद्याच्या पिढीला निसर्ग आणि इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने बारामती ट्रेकर्स क्लब ने चालू केलेल काम नक्कीच यशस्वी होईल असे मत प्रसिद्ध सूत्रसंचालक शशांक मोहिते यांनी व्यक्त केले. या वेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रेकर्स क्लब चे अध्यक्ष सचिन वाघ यांनी केले. रंजित ताम्हणकर, विपूल पाटील, अनिल होळकर, आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड चे कोषाध्यक्ष अमोल काटे, नगरसेवक सुधीर पानसरे, राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष राहुल वाबळे, राहुल झाडें ऋतुराज काळकुटे, जितेंद्र काटे, नानजी बाबर, योगेश वाघ आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभम निंबाळकर यांनी केले.तर आभार प्रशांत बापू पवार यांनी व्यक्त केले.