बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करुन आरोपी केला जेरबंद .
सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत
बारामती तालुका गुन्हे पथकाने बारामती मध्ये खुनाच्या गुन्हयातील आरोपी कडुन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करुन आरोपी केला जेरबंद .
सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत
क्राईम बारामती वार्तापत्र
गेल्या महीनाभरापुर्वी बारामती परीसरामध्ये माळेगाव बुाा येथे गोळीबार केलयाच्या घडना घडल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश ढवाण यांनी बारामती परीसरात कोंबिंग ऑपरेशन तसेच नाकाबंदी करून रेकॉर्ड वरील आरोपी चेक करणेची मोहीम आखली व त्यासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन गुन्हे पथकातला केले त्याप्रमाणे गुन्हे पथकातील अंमलदार बारामती तालुका पो स्टे हददीत कोम्बीग ऑपरेशन, रेकार्डवरील आरोपी तसेच माहतीगार गुन्हेगार चेक करण्याची मोहीम चालु असताना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली कि खुनाचे गुन्हयातील जामीनावर असणारा आरोपी नामे शुभम विकास राजापुरे हा येरवडा जेल मधुन पॅरोल रजेवर बाहेर आलेला आहे.
सध्या त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल असुन तो कमरेला लावुन फिरत असतो.अशी खात्रीलायक बामती मिळालेवर पो.नि महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन सुचना देवुन त्यास ताबेत घेणेचे आदेश दिले, त्याप्रमाणे गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी माहती घेवुन शुभम राजापुरे हा तांदुळवाडी मध्ये येणार असल्याची माहती मिळताच त्या ठिकाणी सापळा रचुन शुभम राजापुरे याला ताब्यात घेवुन त्यांचे पुर्ण नाव विचारले असता त्याने त्यांचे नाव शुभम विकास राजापुरे वय २४ वर्षे रा.मुर्टी ता.बारामती जि.पुणे असे सांगितले. त्याची अंग झडती घेतली असता त्याचेकडुन कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल ,त्यामध्ये मॅग्झीन व दोन जिवंत काडतुस हस्तगत करणेत आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादासाहेब ठोंबरे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अमलदार राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, रणजीत मुळीक यांच्या पथकाने केली.
पोलिसांकडून सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहेत. या ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील आरोपी तसेच माहितगार असलेले गुन्हेगार तपासण्याची मोहीम सुरू आहे. या अंतर्गत खबऱ्यामार्फत पोलिसांना एका खुनाच्या गुन्ह्यातील जामीनावर असणारा आरोपी शुभम विकास राजापुरे हा पॅरोल रजेवर सध्या असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आहे आणि तो कमरेला लावून फिरत असतो अशी माहिती मिळाली.
त्यावरून महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला या संदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तांदुळवाडी येथे येणार असलेल्या शुभम राजापुरे साठी सापळा रचला. माहितीनुसार बरोबर शुभम तेथे पोहोचताच त्याचे नाव विचारल्यानंतर त्याने शुभम विकास राजापुरे (वय 24 वर्षे, रा. मूर्टी ता. बारामती) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या कमरेला डाव्या बाजूस गावठी बनावटीचे पिस्तूल त्यामध्ये मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी राजापुरे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर आर्म अॅक्ट 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.