बारामती तालुका गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी ; २ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त
गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल. हस्तगत....
बारामती तालुका गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगीरी ; २ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त
गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल. हस्तगत….
पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी…..
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलीस गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन आलेल्या आरोपीला गजाआड करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी धर्मराज पोपट वाघमारे (वय ३३ वर्षे) (रा शेळगाव ता इंदापुर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान याच्याकडून २ गावठी पिस्टल सह ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
गुन्हेशोध पथकाने एका वर्षात १८ पिस्टल हस्तगत केली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी आहे. मागील काही दिवसापासून पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार प्रकरण, बँकावरती सशस्त्र दरोड्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्र जप्ती करणेकामी कोम्बीग ऑपरेशन तसेच अभिलेखावरील संशयित आरोपीची वाहन झडती तसेच घरझडतीचे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करत पोलीस निरीक्षक ढवाण यांनी गुन्हेशोध पथकाला सोबत घेऊन गावठी पिस्टल ची शोध मोहीम हाती घेतली. व बारामती तालुका हृददीमधील संशयित आरोपीचे वाहन घर झडती घेण्याचे काम चालू केले. या दरम्यान (दि:२५) रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सूर्यनगरी येथे मोनिका लॉन्स येथे इसम नामे धर्मराज पोपट वाघमारे हा त्याचे लाल रंगाचे गाडीमध्ये दोन गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन येणार आहे. अशी गोपींनीय माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ढवाण यांनी त्यांचे गुन्हे शोध पथकाला बोलावून सदर बातमी चा आशय सांगुन सदर इसमावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुन्हेशोध पथक रवाना होऊन मोनिका लान्स येथे सापळा रचून बसले. त्यावेळी एक लाल रंगाची स्वीफट गाडी न (एमएच ४२ एएक्स ७०६०) ही जळोची बाजुने येऊन मोनिका लॉन्स समोर उभी राहताच गुन्हेशोध पथकातील स्टाफ ने स्वीफट मध्ये बसलेल्या इसमास ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव धर्मराज पोपट वाघमारे (वय ३३ वर्षे) (रा शेळगाव ता इंदापुर जि) असे सांगितले.
त्याची अंगझडती व गाडीची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५० हजार रूपये किमतीचे २ गावठी पिस्टल व ३ जिवंत काडतुसे व कार असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दरम्यान भारतीय शस्त्र अधिनियम ५(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गन्हयाचा अधिक तपास सपोनि विधाते हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक रणजीत मुळीक, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, सदाशीव बडगर यांनी केली आहे.