बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई;रिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात
१५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत.

बारामती तालुका पोलिसांची कडक कारवाई;रिल्ससाठी जाळ-धूर काढणाऱ्या चार बुलेट पोलिसांच्या ताब्यात
१५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत.
बारामती वार्तापत्र
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आणि शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार बुलेटस्वारांवर बारामती तालुका पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या तरुणांनी कटफळ पालखी मार्गावरील ब्रिजखाली मोठ्या आवाजात बुलेट चालवत जाळ आणि धूर काढत रेसिंग करत रील्स बनवली होती. ही व्हिडिओ क्लिप दि. २० रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
सदर रील्समध्ये वापरलेल्या बुलेट मोटरसायकलींचे क्रमांक एम.एच ४२ बी एच ७४०४, एम.एच १२ पी एल ७६३७, एम.एच १२ के एम ८५९२, एम.एच ४२ बी.ए ५५५३ असे आहेत.
या चारही मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, संबंधित चालकांविरुद्ध वाहतूक नियमांचे उल्लंघन, ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने १५ दिवसांसाठी डिटेन करण्यात आली आहेत. शहरात वेगाने वाढणाऱ्या ‘व्हायरल होण्याच्या’ स्पर्धेमुळे युवकांमध्ये रेसिंग, धूर काढणे आणि आवाज वाढवणे या प्रकारात वाढ होत आहे. यामुळे केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत नाही, तर वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चौकट:
पेन्सिल चौक, एमआयडीसी परिसर या ठिकाणी कोणीही अतिवेगाने मोठ्या आवाजात वाहने चालविणे अथवा इतर प्रकार करून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले मिळून आल्यास तत्काळ कळवावे त्यावर कठोर कारवाई केली जाईल.






