बारामती तालुका पोलीसांची धडाकेबाज कामगिरी ; शेळी – बोकड, गाडयांच्या बॅट -या चोरणारी टोळी केली जेलबंद
बारामती तालुका पोलीसांनी या चोरांना पकडून बंदोबस्त केल्याने शेतक-यांसाठी समाधानाची बाब आहे.
बारामती तालुका पोलीसांची धडाकेबाज कामगिरी ; शेळी – बोकड, गाडयांच्या बॅट -या चोरणारी टोळी केली जेलबंद
बारामती तालुका पोलीसांनी या चोरांना पकडून बंदोबस्त केल्याने शेतक-यांसाठी समाधानाची बाब आहे.
बारामती वार्तापत्र
करोना महामारी, अतिवृष्टी यामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडलेला असतानाच मागील सात ते आठ महिन्यापासून बारामती तालुक्यातून शेळी, बोकड चोरीस जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत्या. त्यामुळे शेतक – यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली होती. बारामती तालुका पोलीस स्टेशन मधून मिळालेली माहिती अशी की शेळी , बोकड , सोन साखळी , गाडयांच्या बॅट -या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लंगुटे यांच्या पथक यांना दिली होती. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व पथकाने गोपनीय माहिती काढून अजय अनिल जाधव वय २२ वर्षे, सिताराम अंकुश भंडलकर वय २७ वर्षे, किरण दामोदर हरिहर वय २४ वर्षे, भरत उर्फ तानाजी बोडरे वय २८ वर्षे सर्व राहणार खांडज, ता.बारामती.जि.पुणे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी असता त्यांनी बारामती तालुका पोलीस हददीतील खांडज, शिरवली, सांगवी, निरावाजग, माळेगाव, पाहूणेवाडी, करावागज, निरावागज, मेखळी, अजंनगाव, नेपतवळण, २२ फाटा, काळा वडा, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील वडगाव , पणदरे, लाटे, खुंटे, शिरष्णे, कांबळेश्वर, माळवाडी, लकडेवस्ती, ढाकाळे, होळ, कोराळे, तसेच फलटण ग्रामिण पोलीस स्टेशन हददीतील गोखळी, राजाळे, सांगवी, मायनगर, सोनगाव बंगला, सोमथळी, सोमवार पेठ, राजाळे, विडणी, पिंप्रद या गावातून आत्ता पर्यंत ८० ते ८५ शेळया, बोकड चोरी केल्याची उघडकीस आले आहे.