बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी १,३८,६२८ रू.चा गुटखा केला जप्त
पुढील तपास सहा.पोलीस फौजदार/पवार हे करीत आहेत.

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी १,३८,६२८ रू.चा गुटखा केला जप्त
पुढील तपास सहा.पोलीस फौजदार/पवार हे करीत आहेत.
क्राईम;बारामती वार्तापत्र
मानवी आरोग्यास घातक असणारे गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी सोमनाथ धोंडीबा गोडसे (वय ४३ वर्षे) (रा.मौजे शिसुफळ ता.बारामती) याला बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडूनच एकूण १ लाख ३८ हजार ६२८ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.
बारामती तालुका पोलीस स्टेशन पोरटे हद्दीत मौजे शिर्राफळ येथे पेट्रोलिंग करीत असताना सोमनाथ धोंडीबा गोडसे हा (मौजे शिसुफळ ता.बारामती) या ठिकाणी बेकायदा बिगर परवाना मानवी आरोग्यास घातक असणारे गुटख्याची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना बातमीदारामार्फत मिळाली.
त्यानंतर तालुका पोलिसांनी लगेचच त्याच्या राहत्या घरात पंचासह जाऊन छापा टाकला असता त्याच्याकडे एकूण १ लाख ३८ हजार ६२८ रुपयांचा गुटखा मिळून आला. त्याच्यावर प्रतिबंधीक अन्न पदार्थ बंदी अन्वये भादंवि कलम ३२८,२७२,२७३,प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहा.पोलीस फौजदार पवार हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख सो ,मा.अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते साो,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण,सहा.पोलीस फौजदार शशिकांत पवार,पोलीस हवालदार रमेश भोसले,पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी केली आहे.