बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामगीरीचा सीलसीला चालुच…..8,20,000/-रू किमतीचा मुददेमाल केला हस्तगत
दोन आरोपीकडुन एक महीन्द्रा कंपनीचा टॅªक्टर, 7 मोटार सायकल, 2 सायकलीसह 200 मीटर विज पंपाची केबल असा 8,20,000/-रू किमतीचा मुददेमाल केला हस्तगत

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामगीरीचा सीलसीला चालुच…..8,20,000/-रू किमतीचा मुददेमाल केला हस्तगत
मागील काही दिवसापासून बारामती तालुका हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने गुप्त माहितीमार्फत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींकडून १ ट्रॅक्टर, ७ दुचाकी २ सायकलीसह २०० मीटर वीज पंपाचा केबल, असा ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नवनाथ केरबा सोनवणे (वय २५ वर्षे, रा. ढेकळवाडी ता. बारामती) व एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे.
मागील काही दिवसापासून बारामती तालुका हद्दीत मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुशंगाने पोलीस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरी उघड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने गुप्त माहितीमार्फत आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता आरोपींनी बारामती तालुका, बारामती शहर, भिगवण, जेजुरी परिसरातून १ ट्रॅक्टर, ७ दुचाकी, २ सायकल व वीज पंपाचे केबल असा ८ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली आहे.