बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत 62305 जणांना covid-19 लसीकरण ! डॉ. मनोज खोमणे यांनी माहिती दिली
सध्या 45 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्वांना सरसकट लस दिली जात आहे.
बारामती तालुका व शहरामध्ये आजपर्यंत 62305 जणांना covid-19 लसीकरण ! डॉ. मनोज खोमणे यांनी माहिती दिली
सध्या 45 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्वांना सरसकट लस दिली जात आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जसजसे वाढत आहेत, तसतशी लसीकरणाची जनजागृती देखील वाढत आहे. यासाठी बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागासह तालुक्याची आरोग्य यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून अखंडितपणे लसीकरणावर प्राधान्य देत असल्याने लसीकरणाचा देखील वेग वाढला आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. तालुक्यामध्ये आतापर्यंत 62305 हजारहून अधिक जणांचे कोरोनाचे लसीकरण झाले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये वेळेवर लस मिळाली नव्हती, तरीदेखील सरासरी दररोज चार हजार जणांचे लसीकरण करण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी झाली आहे.
यापूर्वी आठवड्यातून तीन दिवस असलेले लसीकरण सध्या आठवड्यातील सर्व दिवस केले जात आहे. सध्या 45 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्वांना सरसकट लस दिली जात आहे. यापूर्वी 45 वर्षे वयोगटाच्या पुढील सहव्याधी असलेल्या 67 हजार जणांना लसीकरण करायचे होते, त्यापैकी 47 हजार हून अधिक जणांनी लस घेतल्याची माहिती खोमणे यांनी दिली.