बारामती तालुक्यांमधील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली झाली कारवाई.
बारामती तालुक्यांमधील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली झाली कारवाई.
बारामती:-प्रतिनिधी
बारामती- उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारामती शहर व तालुक्यात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात आली. शहरातील इंदापूर रोड लगत आमराई भागात मटका चालवणाऱ्या विजय राजेंद्र सावंत, नितीन प्रताप बगाडे (दोघे.रा.आमराई यांच्यासह महेश सोनवणे (रा.दौंड, जि.पुणे) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील लकडेनगर मध्ये गावठी हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करत संदीप शंकर गव्हाणे ( रा.माळेगाव बुद्रुक,लकडे नगर) व हातभट्टीदारूसाठी लागणारा कच्चामाल पुरवणाऱ्या अज्ञात किराणा दुकानदाराविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईत मिळून ३७ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पो.हवा. सुरेश भोई, तानाजी गावडे, पो.ना. आप्पा दराडे, वैभव साळवे, रमेश केकाण, गणेश काटकर, राहुल लाळगे, पो.कॉ. श्रीकांत गोसावी यांनी केली आहे.