क्राईम रिपोर्ट

बारामती तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी बळजोरीने शारीरिक संबंध; आरोपीस अटक

७ ऑगस्ट या दिवशी त्रासाला कंटाळून पीडिताने पोलीस ठाण्यात तक्रार

बारामती तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी बळजोरीने शारीरिक संबंध; आरोपीस अटक

७ ऑगस्ट या दिवशी त्रासाला कंटाळून पीडिताने पोलीस ठाण्यात तक्रार

बारामती वार्तापत्र 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण करून तिच्याशी बळजोरीने शारीरिक संबंध निर्माण केले. त्याची छायाचित्रे, चित्रफीत सिद्ध करून मनाविरुद्ध पुनःपुन्हा अत्याचार केले.

या प्रकरणी गौरव निंबाळकर याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्यासह शारीरिक अत्याचार आणि इतर कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.

पीडिता सोमेश्वरनगर येथे शिक्षण घेत असतांना तिची गौरवशी ओळख झाली. त्याने केलेल्या शरीरसुखाच्या मागणीला नकार दिल्यानंतर ‘मी तुझ्या घरच्यांना चुकीचे सांगून तुझी अपकीर्ती करीन’, अशी धमकी दिली. डिसेंबर २०२१ मध्ये अल्पवयीन असतांनाही तिच्याशी संबंध निर्माण केले. त्यानंतर वेळोवेळी धमकी देत शारीरिक अत्याचार केले. ७ ऑगस्ट या दिवशी त्रासाला कंटाळून पीडिताने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

उरुळी कांचन – अल्पवयीन मुलीवर १ वर्षांपासून वांरवार लैगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ३० वर्षीय विनायक चव्हाण याला उरुळी कांचन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जुलै २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीमध्ये घडली. आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले.

अल्पवयीन मुली असुरक्षित असणे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अशोभनीय ! अशा वासनांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

Related Articles

Back to top button