
बारामती तालुक्यातील एका महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार
१४ लाखांची खंडणी
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील एका महिलेवर तिघांनी सामूहिक अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ, फोटो काढत तिला ब्लॅकमेल करून तिच्याकडून सुमारे १४ लाखांची खंडणी घेतली. शिवाय तिला पुढे करत एका सामाजिक कार्यकर्त्याच्या खूनाचा कट आखण्यात आल्याबाबतची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मात्र, खूनाच्या प्रकरणात सहभागाला नकार देत यासंबंधी थेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश सर्जेराव पवार (रा. प्रगतीनगर, तांदूळवाडी रोड, बारामती), अनिल शिवाजी गुणवरे (रा. श्रीरामनगर, बारामती), वाघ (पूर्ण नाव, पत्ता नाही) एक अनोळखी यूट्यूबर (नाव, पत्ता नाही), महेंद्र उर्फ भाऊ खैरे (पूर्ण नाव, पत्ता नाही), पिसे (पूर्ण नाव, पत्ता नाही) या सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या गुन्ह्यातील पीडित महिला ही मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने माळेगावमध्ये राहते. दरम्यान ती माळेगावमधील एका जीममध्ये व्यायामला जात असताना तिची गणेश पवार याच्याशी ओळख झाली. ओळखीतून पुढे एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत संपर्क झाला. गणेश पवारने महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्याचे व्हिडिओ, फोटोज त्याने काढले. त्याचा वापर करत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यातून त्याने महिलेकडून मित्राच्या खात्यावर वेगवेगळ्या वेळी अकरा लाख सत्तर हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले. याशिवाय या महिलेवर माळेगाव, सुयश हॉटेल भिगवण, तापोळा, या व इतर ठिकाणी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. पवार, महेंद्र खैरे, पिसे यांनी तिला धाक दाखवत तिरुपतीला नेले. तेथून परतत असताना तिच्यावर सामुहिक अत्याचार केला. तेथून परतल्यावर त्यांनी तिची भेट एका यूट्यूबरशी घालून दिली. हे पत्रकार असून ते व्हीडीअो प्रसिद्ध करतील अशी भिती घालत त्यालाही पैसे द्यायला लावले. व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होवू नयेत या भितीपोटी ही महिला गप्प होती. सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांच्या खूनाचा कट त्यांनी आखला होता. तु टिंगरे यांना नादी लाव, त्यानंतर त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल कर अशी मागणी आरोपींनी केली. या महिलेने त्यास नकार दिल्यावर आरोपीनी या महिलेमार्फत मच्छिन्द्र टिंगरे यास कुठल्यातरी माळरानावर बोलवून घेऊन त्यांचा खून करण्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक माहिती महिलेने फिर्यादीत नमूद केली आहे. या प्रकरणी मास्टरमाईंडचा शोध घेण्याची मागणी टींगरे यांनी पत्रकार परीषद घेत केली आहे.