बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेची India Book of Records मध्ये नोंद
(30 तासांच्या सलग Multi-Trade Skill Demonstration Programme साठी मानांकन)

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेची India Book of Records मध्ये नोंद
(30 तासांच्या सलग Multi-Trade Skill Demonstration Programme साठी मानांकन)
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेने राबविलेल्या विशेष उपक्रमाला मोठे यश मिळाले असून, या उपक्रमाची India Book of Records मध्ये नोंद करण्यात आली आहे. याबद्दल संस्थेला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांना कृतीतून आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला “Longest Continuous Multi-Trade Skill Demonstration Programme” हा उपक्रम दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होऊन 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत अखंडितपणे पार पडला. तब्बल 30 तास चाललेल्या या उपक्रमात संस्थेतील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाचा उद्देश आदरणीय दादांच्या स्वप्नातील समाज घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करणे, विविध ट्रेडमधील प्रत्यक्ष अनुभव देणे तसेच त्यांचा आत्मविश्वास व कार्यक्षमता वाढविणे हा होता. तसेच कौशल्य विकासाबाबत समाजामध्ये जनजागृती करणे हा देखील या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू होता.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.






