बारामतीच्या पोलीस निरीक्षकांनी धमकावल्याचा आरोप
निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

बारामतीच्या पोलीस निरीक्षकांनी धमकावल्याचा आरोप
निकाळजे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात हातगाडी धारकांवर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई संदर्भात ब्ल्यू पॅंथर सामाजिक विकास प्रतिष्ठान च्या वतीने चर्चा करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असता पोलीस निरीक्षकांनी अरेरावी करून धमकावल्याचा आरोप प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी केला आहे.
बारामतीत पोलिसांच्या वतीने रस्ता मोकळा करण्यासाठी कारवाई करण्यात येत होती त्या संदर्भात ब्ल्यू पॅंथर सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगलदास निकाळजे हे 10 मार्च रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान शहर पोलीस ठाण्यात गेले असता हा शिंदे यांनी काही ऐकून घेण्यापूर्वीच अश्लील भाषेत शिवीगाळ केली व उपस्थित सर्व हातगाडीधारकांसमोर आपल्याला अपमानित केल्याचा आरोप निकाळजे यांनी केला.
व्हिडिओ व्हायरल
मंगलदास निकाळजे यांनी या घटनेचा व्हिडीओ काढला होता. तो सध्या व्हायरल झाला असून यामध्ये श्री शिंदे यांनी बारामतीच्या सामान्य नागरिकांना त्रास होत असेल तर मी कोणाचीही गय करणार नाही असे त्यात स्पष्टपणे म्हटल्याचे दिसत आहे.
मी मागासवर्गीय समाजाचा असल्याने मला अपमानीत केल्याचा आरोप निकाळजे यांनी केला तसेच सदर चे रेकॉर्डिंग आपल्याकडे असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निकाळजे यांनी केले आहे.
निकाळजे यांना मी ओळखत नाही. मी जे काही करतो आहे, ते बारामतीच्या हितासाठी करतो आहे. त्यामुळे याप्रश्नी अधिक काही बोलू इच्छित नाही.
– नामदेव शिंदे, पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे.