बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना;अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या
मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज

बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना;अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या
मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली असून, अज्ञात महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
काळखैरेवाडी येथील माळरानावर सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. तिची ओळख अद्याप पटलेली नसून, आरोपी देखील अज्ञात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे संकेत मिळाले असून, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारणे स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला
घटनेची माहिती मिळताच सुपे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे बारामती तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






