स्थानिक
बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे १९ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार

बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथे १९ मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार
बारामती वार्तापत्र
नागरिकांच्या शासनाच्या विविध विभागाकडील अडचणी दूर करण्यासोबतच त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार, १९ मे २०२५ रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे विठ्ठल मंदीर, जळगाव सुपे येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात येणार आह,अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाहीत दिनात मांडाव्यात, असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.