बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक
बारामती तालुक्यातील जैनकवाडी येथे ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक
बारामती वार्तापत्र
जैनकवाडी तालुका बारामती येथे पाणी फाउंडेशन च्या वतीने तसेच सोमेश्वर येथील शंकर अग्रो सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने जनक वाडी येथील शेतकरी पंकज पवार यांच्या तूर या पिकावर ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते .
या प्रसंगी फिनिक्स ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी चे प्रतीक गायकवाड, अक्षय पवार व सचिन सूर्यवंशी, सोमनाथ माने, अभिजित पवारशिवम पवार, पंकज पवार, कुमार पवार, गौरव पवार,अमर बोराडे, पाणी फाउंडेशन तालुका समन्वयक – पृथ्वीराज लाड उपस्तीत होते.
शेतीमध्ये मजुरांची कमतरता व काही पिके मोठे असल्यानंतर हातपंपांनी फवारणी करावी लागते या गोष्टीचा विचार करून सध्याच्या काळात ड्रोन द्वारे फवारणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे ड्रोन द्वारे फवारणी केल्यास शेतकऱ्यांच्या वेळेची बचत तसेच कमी वेळात व कमी पाण्यात फवारणी शक्य होत आहे हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रत्यन फिनिक्स ऍग्रो फार्मर च्या वतीने करण्यात येत आहे.
शेती करताना खर्च वाचला वेळेची बचत झाली व कमी पाण्यात फवारणी झाली व कीटकनाशकापासून शेतकरी बांधवांना फवारणी करताना होणारा धोका कमी झाला पहिली फवारणी केली होती तेव्हा मला तीन एकर क्षेत्राला वीस पंप मारावे लागले त्यासाठी माझे तीन ते चार तास गेले आता ड्रोन द्वारे त्याच तीन एकर तुरीच्या क्षेत्रामध्ये पंधरा मिनिटे मध्ये फवारणी झाली त्यामुळे समाधान होत असल्याचे स्थानिक
शेतकरी पंकज पवार यांनी सांगितले.