बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावठाण मधील बीकेबिएन रोड एक वर्षांपासून रखडला..
रस्ता करण्यासाठी मुहूर्त काढावा लागणार की काय? नागरिकांचा संतप्त सवाल..
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावठाण मधील बीकेबिएन रोड एक वर्षांपासून रखडला..
रस्ता करण्यासाठी मुहूर्त काढावा लागणार की काय? नागरिकांचा संतप्त सवाल..
बारामती वार्तापत्र
मोरगाव ते बारामती, निरा–नरसिंगपूर (बी.के.बी.एन) रस्त्याचे काम बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी हद्दीत गेली एक वर्षांपासून रखडला आहे. डोर्लेवाडी हद्दीत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे छोटे-मोठे अपघात रोज होत आहेत याचा नाहक त्रास वाहनचालकाला सोसावा लागत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रस्ता लवकर पूर्ण करण्याचा आदेश कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले आहेत. मात्र कॉन्ट्रॅक्टर कडून आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
बीकेबीएन हा रोड गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे सध्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी हद्दीत संपुर्ण रोड रखडला आहे. तर झारगडवाडीत काही ठिकाणी अंतर्गत रोडवर डांबरीकरण रखडलेले आहे यामुळे नागरिकांना गेल्या अनेक महिन्यापासून त्रास सहन करावा लागत आहे झारगडवाडी येथील अंतर्गत रस्त्यावर कॉन्ट्रॅक्टर कडून फक्त खडी टाकण्यात आली आहे गेल्या दोन महिन्यापासून ही टाकलेली खडी उचकटलेली आहे यामुळे येताना जाताना दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावरून ऊस वाहतूक होत असते. खडीला धार असल्याने दुचाकी टायरला चिरा पडत आहेत. याबाबत कॉन्ट्रॅक्टर यांना वारंवार सांगून देखील ते दखल घेत नाहीत यामुळे शनिवारी सकाळी बिकेबीएन रोडवर रास्ता रोको करण्याचा इशारा झारगडवाडीच्या नागरिकांनी दिला आहे.