बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत चिमुकल्यासोबत केलं घृणास्पद कृत्य; त्या घटनेतील सत्य आलं समोर
आजीला पाहून नातू मोठमोठ्याने रडू लागला.

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीत चिमुकल्यासोबत केलं घृणास्पद कृत्य; त्या घटनेतील सत्य आलं समोर
आजीला पाहून नातू मोठमोठ्याने रडू लागला.
बारामती वार्तापत्र
मुलगा व मुलगी एकाच अंथरूणात आढळून आल्याने मुलीच्या नातेवाईकाने फिर्यादीच्या मुलाला मोबाईलचे चार्जरने मारहाण करून गुप्तेंद्रीयावर तिखट लावण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
डोर्लेवाडी (ता. बारामती) परिसरात गुरुवारी (ता. 27 फेब्रुवारी) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी थोपटेवाडी येथील फिर्यादी महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर बारामती शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व BNS-118(1), बाल न्याय कायदा (जे. जे. अॅक्ट 72 (1)), मुलांची काळजी आणि अँट्रोसिटी कलम 3(1) (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला या डोर्लेवाडी येथे राहत असलेल्या आपल्या नाताला भेटण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आजीला पाहून नातू मोठमोठ्याने रडू लागला. विश्वसात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने मला सांगितले की, गुरुवारी दुपारी मी व आरोपीची मुलगी ही एकाच अंथरूणात झोपलेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी आले व त्यांनी आम्हा एका अंथरुनात झोपलेले पाहिले.
या कारणावरुन नातवाच्या पाठीवर पोटावर उजव्या बाजुस व डाव्या हाताच्या दंडावर मोबाईलच्या चार्जरने मारहाण केली. तसेच अवघड जागेवर लाल तिखट लावून एक चमच लाल तिखट खाण्यास दिले असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी गावी गेल्या व घरातील लोकांनी अर्णव यास मारहान केल्याचे सांगितले.
दरम्यान, डोर्लेवाडी येथे जावुन नाताला घरी घेऊन आल्या. त्यानंतर फिर्यादी महिलेने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली बारामती शहर पोलीसांना फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.