शैक्षणिक

बारामती तालुक्यातील पिंपळी मध्ये नेट स्मार्ट व्हिलेज ची भेट

सर्व आस्थापना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार

बारामती तालुक्यातील पिंपळी मध्ये नेट स्मार्ट व्हिलेज ची भेट

सर्व आस्थापना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार

बारामती वार्तापत्र

पिंपळी ग्रामपंचायत येथे नेट स्मार्ट व्हिलेज योजना राबविण्यात येत आहे या अंतर्गत योजनेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी पिंपळी ग्रामपंचायत ला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

या प्रसंगी योजनेच्या अधिकारी स्नेहा गुंड ,कुणाल भारविरकर यांचे स्वागत सरपंच स्वाती ढवाण यांनी केले.
या प्रसंगी उपसरपंच अजित थोरात,सदस्य संतोष ढवाण , वैभव पवार, उमेश पिसाळ, सदस्या अश्विनी बनसोडे व राष्ट्रवादी मिडिया प महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बनसोडे,फलोत्पादन संघ संचालक नंदन जरांडे व हरिभाऊ केसकर, बलभीम यादव,रहुनाथ देवकाते, सहाय्यक गटविकास अधिकारी शेटे, ग्रामपच्यात अधिकारी बाळासाहेब भोईटे आदी उपस्तीत होते.

स्मार्ट व्हिलेज योजना अंतर्गत पथकाने जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, या ठिकाणी भेट दिली व कार्याची माहिती घेतली.

सर्व आस्थापना इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाणार असून याशिवाय शेतीविषयक कामकाजात ए आय तंत्रज्ञान, ठिबक, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, महिलांना प्रशिक्षण रोजगार निर्मिती आदी बाबीचा समावेश असल्याचे योजनेच्या अधिकारी स्नेहा गुंड व कुणाल बारवीरकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायत कार्याची माहिती सरपंच स्वाती ढवाण यांनी दिली.

Back to top button