बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याने 3450 प्रति टन दर जाहीर केल्यानंतर संचालक योगेश जगताप यांचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
कमी भाव हा शेतकऱ्यांवरती अन्यायकारक

बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याने 3450 प्रति टन दर जाहीर केल्यानंतर संचालक योगेश जगताप यांचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
कमी भाव हा शेतकऱ्यांवरती अन्यायकारक
बारामती वार्तापत्र
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा मागील हंगामाचा भाव कारखान्याचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिटन 3450 जाहीर केल्यानंतर शेतकरी सभासदांमध्ये नाराज आहे.
माळेगाव कारखान्यावरती ज्यावेळी चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची सत्ता होती त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट कसा जास्त दर बसत आहे ते सांगत होते.
परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः चेअरमन असून कारखान्याने 3450 प्रतिटन हा दर जाहीर केलेला आहे.हा दर जाहीर झाल्यानंतर आता सोशल मीडियामध्ये कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांचा उसाला प्रतिटन जास्त दर मिळत आहे.हे सांगतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.त्यामध्ये संचालक योगेश जगताप म्हणत आहेत.
फक्त कारखाना नीट चालला असता तरी 4060 रुपये भाव आपल्याला देता आला असता. त्याच्यापेक्षा मिळणारा कमी भाव हा शेतकऱ्यांवरती अन्यायकारक आहे. अस सध्याचे संचालक त्यावेळी योगेश जगताप या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत.हा व्हिडिओ माळेगांव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासद जोरदारपणे व्हायरल करत आहेत.
चौकट
सभासदांनी आपले मत विकल्यामुळे 3450 रुपये प्रति टन भाव मिळाला आहे अध्यक्ष महोदय असाही उल्लेख त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे.