स्थानिक

बारामती तालुक्यातील माळेगांव खुनातील आरोपीस जामीन मंजूर

५०,०००/- रुपयांच्या मुचलक्यावर व अटी व शर्तींवर

बारामती तालुक्यातील माळेगांव खुनातील आरोपीस जामीन मंजूर

५०,०००/- रुपयांच्या मुचलक्यावर व अटी व शर्तींवर

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगांव पोलिस स्टेशन यांच्या हद्दीतील खांडज गावामध्ये दि. ०५ मे २०२५ रोजी एका इसमाचा गावातील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला होता. सदर मृतदेह ज्या इसमाचा होता त्याच्या मुलाने माळेगांव पोलिस स्टेशन येथे त्याबाबत फिर्यादी नोंदवली होती.

प्रथम दर्शनी तपासात मालेगाव पोलिसांनी २ इसमास संशयित म्हणून दि. ०८ मे २०२५ रोजी अटक केली होती. तेव्हापासून सदर दोन्ही इसम येरवडा पुणे येथील मध्यवर्ती कारागृहात जेरबंद होते.

याबाबत आरोपी क्र १ अनिल बबन जाधव तर्फे बारामती येथील ॲड. शुभंकर राजेश बाचल यांनी आरोपीस जामीन मिळणेकरीता मे. सेशन न्यायालय बारामती यांच्याकडे दि. ०८ डिसेंबर २०२५ रोजी अर्ज दाखल केला होता.

सदर अर्जावर सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपी तर्फे त्याचे वकिलांनी पुराव्याची अस्पष्टता, परीस्थितीजन्य पुराव्यांवर अवलंबून व इतर महत्वाच्या मुद्द्यांवर युक्तिवाद केला.

युक्तिवादासोबतच ना.सर्वोच्च न्यायालय, दिल्ली व काही ना. उच्च न्यायालय यांचे न्यायनिवाड्याचे संदर्भ दाखले सोबत दिले. सदर युक्तीवाद मे. कोर्टास योग्य वाटल्याने सदरचा युक्तिवादातील अनेक मुद्दे ग्राह्य धरून ५०,०००/- रुपयांच्या मुचलक्यावर व अटी व शर्तींवर बारामती येथील मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. हेतेंद्र वाणी साहेब यांच्या न्यायालयाने आरोपी अनिल बबन जाधव यास ०३ जानेवारी २०२६ रोजी जामिनावर मुक्त केले.

सदर कामकाज मुंबई उच्च न्यायालय, पुणे जिल्हा व सत्र न्यायालय व बारामती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे कामकाज करत असणारे ॲड. शुभंकर राजेश बाचल यांनी पाहिले.

Back to top button