बारामती तालुक्यातील माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर
4 जणांविरोधात माळेगाव पोलिसांत फिर्याद
बारामती तालुक्यातील माळेगावात तरुणावर कोयत्याने सपासप वार; हल्ल्याचं कारणही आलं समोर
4 जणांविरोधात माळेगाव पोलिसांत फिर्याद
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राहणाऱ्या चार तरुणांनी जुन्या भांडणाच्या रागातून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. हल्ला झालेला तरुण गंभीर जखमी झाला असून, माळेगाव पोलिसांनी काही तासातच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
प्रकाश दिगंबर भापकर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी भापकर यांनी 4 जणांविरोधात माळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन बाळू जाधव यांच्या वडीलाबरोबर भांडण करून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली, हा जुना राग मनात धरून इतर तिघांच्या मदतीने तावरे कॉम्प्लेक्स, शिवनगर, माळेगाव येथील भिंताडे फायनान्स येथे प्रकाश भापकर हे काम करीत असलेल्या ठिकाणी जात भापकर यांच्यावर त्याचवेळी आरोपी चेतन बाळु जाधव, मयुर रणजित जाधव, विजय बाळासो कुचेकर (तिघे रा. माळेगाव बु ता. बारामती), दिनेश आडके (रा. शिरवली ता. बारामती) यांनी आफिसमध्ये प्रवेश केला व भापकर यांच्यावर अचानकपणे कोयत्याने सपासपा वार केले.
पोलिसांच्या पथकाची कामगिरी
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, माळेगावचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, देविदास साळवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद तावरे, पोलीस अंमलदार अमर थोरात, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर सानप, नंदकुमार गव्हाणे, राहुल पांढरे विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, जालिंदर बंडगर, विकास राखुंडे व होमगार्ड सागर कोळेकर विक्रम मदने यांच्या पथकाने केलेली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करीत आहेत.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून 26 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला.
ही घटना सोमवारी (दि.2) सायंकाळी हसूल परिसरातील कारागृहाच्या बाजूच्या मैदानावर घडली. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे (वय 26, रा. चेतनानगर, हसूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अनिकेत गायकवाड व गणेश सोनवणे यांची नावे समोर आली असून, शोधासाठी चार पथके रवाना झाली. या हत्येप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.