बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यातील ट्रॅक्टर यार्ड मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
कितवा नंबर आहे हे पाहण्यासाठी गाडी सोडुन गेले होते

बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यातील ट्रॅक्टर यार्ड मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
कितवा नंबर आहे हे पाहण्यासाठी गाडी सोडुन गेले होते
बारामती वार्तापत्र;निहाल भोसले प्रतिनिधी
बारामती: दि. १८/०२/२०२५ रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान माळेगाव साखर कारखाना टॅक्टर यार्डामध्ये एका ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी मालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
याबद्दल सविस्तर हकीगत अशी की १८/०२/२०२५ रोजी सकाळी सहा वाजता हिरामण चरणदास चव्हाण हे त्याची बैलगाडी घेवून शारदानगर येथे ऊसतोडायला गेले होते ते ऊस तोडुन माळेगाव साखर कारखाना येथे दुपारी तीन वाजता बैलगाडीमध्ये ऊस घेवून परत आले होते व बैलगाडी यार्डामध्ये गाडी नंबरला लावून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते गाडीचा कितवा नंबर आहे हे पाहण्यासाठी गाडी सोडुन गेले होते, त्यावेळी त्यांना टॅक्टरचे यार्डामध्ये अज्ञात वाहनाचा अपघात होवून ते मयत झालेले आहेत.
त्यांना माळेगाव साखर कारखान्याच्या ॲम्बुलन्स मध्ये रुई येथील ग्रामीण हॉस्पीटल मध्ये नेले आहे.
अपघातातील मयत व्यक्तीचे भाऊ श्री.विलास चरणदास चव्हाण, ऊस तोड मजुर मुळ रा. पिंपरखेड तांडा ता. चाळीसगाव जि जळगाव, सध्या रा. माळेगाव साखर कारखाना ता. बारामती जि.पुणे यांनी याबाबत माळेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
घटनेचा अधिक तपास माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री.संजय मोहिते यांच्यासह तपासी अंमलदार ,पो. हवा. श्री.थोरात करीत आहेत.