माळेगाव बु

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन

एफआरपीचे दोन तुकडे करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आंदोलन

एफआरपीचे दोन तुकडे करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी संचालकांच्या तसेच प्रशासनाच्या अनागोंदी व भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कारखाना कार्यस्थळावर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.

या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, अ‍ॅड. एस. एन. जगताप, संदीप गुजर आदींसह बहुसंख्येने ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.

सत्ताधारी संचालक मंडळाच्या तसेच प्रशासनाच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभाराविषयी निषेध नोंदविताना अनेक सभासदांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. सत्ताधारी संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीचा पहिला हप्ता 2800 रुपये प्रतिटन देऊन तसेच उर्वरित 332 रुपये निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून 20 मार्चपर्यंत देण्याचे सांगितले.

त्यामुळे एफआरपीचे दोन तुकडे करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली, असा आरोप करण्यात आला. कारखान्याच्या कामगारांचा पगार वेळेत न होण्यासही कारखाना प्रशासनाला जबाबदार धरून कारखाना कोणत्या दिशेला जात आहे, याबाबत प्रश्नांचा भडिमार आंदोलकांनी केला.

कोट्यवधी रुपये खर्च करून कारखाना प्रशासनाने उभारलेल्या ईटीपी प्लांटचा कोणताही फायदा होत नसून पूर्वीप्रमाणेच नदीमध्ये कारखान्याचे प्रदूषित काळे पाणी सोडले जात असल्याचा आरोप केला गेला, तर सध्या सभासदांचा तुटणारा ऊस फडात तुटून पडत आहे तसेच संथगतीने उसाला तोड दिली जात असून, कारखाना कार्यस्थळावर देखील उसाचे भरलेले ट्रॅक्टर ट्रेलर खाली होण्यास उशीर होत आहे.

अनेक ठिकाणी ऊस जाळून आणला जात आहे. त्यामुळे सभासदांना होणार्‍या तोट्याची चिंता आंदोलकांनी व्यक्त केली. सत्ताधारी संचालक मंडळाचा आणि प्रशासनाचा अनागोंदी आणि गोंधळ कारभार पाहता माळेगाव कारखाना अधोगतीकडे चालला असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

या वेळी अ‍ॅड. एस. एन. जगताप, गणपतराव देवकाते, अनिल जगताप, राजेंद्र काटे, ज्ञानदेव बुरुंगले, सुशील जगताप, प्रेमजित खलाटे, नितीन तावरे, इंद्रसेन आटोळे, रोहन देवकाते, अमोल कोकरे आदींनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. सूत्रसंचालन धनराज निंबाळकर यांनी केले. गौरव जाधव यांनी आभार मानले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, संचालक मदननाना देवकाते, तानाजी कोकरे, तानाजी देवकाते, स्वप्नील जगताप, बन्सीलाल आटोळे, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी स्वीकारले.

कारखाना निवडणूक लढण्याची घोषणा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभाराविरोधात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या न्याय्य हक्कासाठी खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितल्यास युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक लढण्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!