माळेगाव बु

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखान्याचा मागील हंगामचा अंतीम दर प्रतिटन ३४५०/- जाहिर

गेटकेन धारकांना मिळणार 3200/- रुपये प्रति टन...तसेच खोडवा अनुदान 150/- रुपये प्रतिटन दिले जाणार...

बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखान्याचा मागील हंगामचा अंतीम दर प्रतिटन ३४५०/- जाहिर

गेटकेन धारकांना मिळणार 3200/- रुपये प्रति टन…तसेच खोडवा अनुदान 150/- रुपये प्रतिटन दिले जाणार…

बारामती वार्तापत्र 

माळेगांव सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने ११,२१,०७६ मे.टनाचे गाळप केलेले असुन रिकव्हरी उतारा ११.८४८ मिळालेली असुन एकुण १२,००,६०० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहेत.

संचालक मंडळाने २०२४-२०२५ हंगामामध्ये गाळप केलेल्या सभासदांचे ऊसास रुपये ३४५०/-प्र.मे.टन व गेटकेन गाळप केलेल्या ऊसास रुपये ३२००/- प्र.मे. टन प्रमाणे अंतिम दर देण्यांत येणार आहे.याशिवाय कारखाना सभासदांना लागण नियोजन धोरणाचे परिपत्रकानुसार व्हरायटी ऊसास अनुदान रुपये १००/-असे एकुण रूपये ३५५०/- तसेच खोडवा अनुदान रुपये १५०/- प्र.मे.टन प्रमाणे असे एकुण रुपये ३६००/- प्र.मे.टन या प्रमाणे ऊसाचा भाव मिळणार आहे.

हंगाम २०२४.२०२५ मधील कारखान्याची एफ.आर.पी.रुपये ३९८८.६४ त्यामधुन ऊस तोडणी वहातुक खर्च ८६३.६४ वजा जाता निव्वळ देय एफ.आर.पी. रुपये ३१२५/- प्र.मे.टन आलेली असुन सभासदांना पहिला हप्ता रुपये ३१३२/- प्र.मे.टन व खोडकी खर्च रुपये २००/- प्र.मे.टन असे एकुण रुपये ३३३२/ प्र.मे.टन प्रमाणे अदा केलेले आहेत.तसेच गेटकेन धारकांना आज अखेर रुपये ३१२५/- प्र.मे.टन प्रमाणे अदा केले आहेत.जाहिर केलेल्या अंतिम भावानुसार उर्वरित देय रक्कमेपैकी सभासदांना रुपये ११८/ प्र.मे.टन व गेटकेन धारकांना रुपये ७५/- प्र.मे.टना प्रमाणे मंगळवार दिनांक १४.१०.२०२५ पर्यंत अदा केले जातील.

तसेच आर्थिक वर्षामध्ये कारखान्याचे कर्मचारी यांना २० % प्रमाणे बोनस जाहिर केला आहे. सभासदांचे ठेवीवरील व ऐच्छीक ठेवीवरील व्याज रुपये ३,५८,४८,१४९/- नुकतेच सभासदांच्या खात्यावरती वर्ग केले आहे.

सन २०२५.२०२६ चे हंगामाचे पुर्वतयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालु असुन गळीत हंगाम वेळेत सुरु करण्याचे दृष्टीने सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशिल आहेत. सर्व कामांची वेळेत पुर्तता करणेबाबत मा. चेअरमन,संचालक मंडळ,कार्यकारी संचालक यांनी सुचना केलेल्या आहेत.

या वर्षी पर्जन्यमान चांगले असुन या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करणेचा मानस कारखान्याचे चेअरमन अजित पवार यांनी व्यक्त केला.त्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन, सभासद व कर्मचारी यांचेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या उच्चांकी ऊस दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन,तोडणी वहातुकदार, कर्मचारी,अधिकारी यांचे मोठे योगदान आहे.

Back to top button