स्थानिक

बारामती तालुक्यातील यात्रा साधेपणाने करण्याचे राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष संदीप बांदल व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांचे आवाहन

देवकाते म्हणाले की, “येणाऱ्या काही दिवसांत माझा वाढदिवस देखील आहे; तोही मी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहे.

बारामती तालुक्यातील यात्रा साधेपणाने करण्याचे राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष संदीप बांदल व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांचे आवाहन

देवकाते म्हणाले की, “येणाऱ्या काही दिवसांत माझा वाढदिवस देखील आहे; तोही मी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आवाहन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विमान अपघातातील दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण बारामती तालुका आणि शहर परिसरात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायती आणि गावांमध्ये होणाऱ्या जत्रा-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावेत, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते आणि तालुकाअध्यक्ष संदीप बांदल यांनी हे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या शोकाच्या काळात कोणत्याही प्रकारचे मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम, डीजे, मिरवणुका किंवा दिखाऊ सोहळे टाळावेत. गावागावातील जत्रा परंपरेनुसार पार पडाव्यात, मात्र साधेपणा आणि संयम पाळला जावा.

यावेळी बोलताना देवकाते म्हणाले की, “येणाऱ्या काही दिवसांत माझा वाढदिवस देखील आहे; तोही मी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आनंदोत्सवापेक्षा आपण आपल्या दिवंगत नेत्याला आदरांजली वाहणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम राखण्याचे तसेच कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

पक्षाच्या वतीने सर्व ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की, दिवंगत नेत्याच्या स्मृतीप्रित्यर्थ सहकार्य करावे आणि जत्रा-उत्सव साधेपणाने पार पाडावेत.

Back to top button