स्थानिक

बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे ईद मिलन कार्यक्रम संपन्न

अभियान २०२२ संकल्पना अंतर्गत

बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे ईद मिलन कार्यक्रम संपन्न

अभियान २०२२ संकल्पना अंतर्गत

बारामती वार्तापत्र

शेख सुभान अली अध्यक्ष – दंगा मुक्त भारत ,प्रदेश सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,महाराष्ट्र ,शिवचरित्र व्याख्याते , यांच्या संकल्पनेतून आणि मोलाच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या मोलाची उपस्थितीत मुहम्मद पैगंबर ( स. ) सर्वांसाठी अभियान २०२२ अंतर्गत बारामती तालुक्यातील मौजे लोणी भापकर गावात सामाजिक एकतेचा संदेश देणारा ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम गावातील बौद्ध समाज मंदिर येथे बौद्ध समाज बांधव , मातंग समाज मंदिर येथे मातंग समाज बांधव तसेच (धनगर वाडा )चोपडे वस्ती येथे धनगर समाज बांधव या आपल्या शोषित वंचित बहुजन समाज बांधवांसोबत एकाचवेळी तिनंही ठिकाणी आनंदाने तसेच एका अनोख्या पद्धतीने सस्नेह शीरखुर्मा पार्टी तसेच सर्व समावेशक ईद मिलनचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला…..

आपल्या देशात नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने ईद मिलन चे कार्यक्रम नेहमीच होत असतात परंतु या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट फार आगळेवेगळे होते बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशन आयोजित ईद मिलन कार्यक्रमची संकल्पना या वर्षीची ईद आपल्यातीलच बहुजन शोषण, पिडीत, वंचित, आदिवासी, दलित , बंजारा, कातकरी, धनगर, भटक्या जमाती, बौद्ध, मातंग , समाजबांधव यांच्या सोबत ते ज्या ठिकाणी ज्या गावात ज्या वाडी वस्तीवर राहतात त्या ठिकाणी जाऊन लहान मुले , मुली , माता भगिनी महीला यांच्या सोबत मा. शेख सुभान अली सर यांच्या उपस्थितीत मुहम्मद पैगंबर ( स. ) सर्वांसाठी अभियान २०२२ या अभियानाअंतर्गत रमजान ईद साजरी करण्यात आली सर्व समाज बांधवांना तसेच माता भगिनींना व लहान मुलांना भेटवस्तू म्हणून नवीन कपडे भेट देऊन त्यांच्याबरोबर गोड शिरखुर्मा खाऊन संबंधित कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि. प्रेषीत महुम्मद पैगंबर (स.) फक्त एका मुस्लिम धर्मासाठी नसून संबंध आखिल मानवतेसाठी आहेत तसेच जगातील सर्व मानव सेवेसाठी आहे हे मोलाचं मार्गदर्शन मा. शेख सुभान अली सर यांच्या उपस्थितीत हा बंधुत्वाचा प्रेमाचा संदेश पोहचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

मुहम्मद पैगंबर ( स.) सर्वांसाठी अभियान २०२२ संकल्पनेचे जनक संयोजक मा. शेख सुभान अली सर यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून बारामती तालुक्यातील मौजे लोणी भापकर या गावातील ग्रामस्थ तसेच आपल्या हक्काच्या जिवाभावाच्या माणसांशी स्नेह – प्रेम , बंधुभाव निर्माण व्हावा तसेच सामाजिक ऐक्य , सदभावना वाढीस लागावी , सण उत्सव साजरे करताना समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग घेऊन संवाद व्हावा आणि वैचारिक बांधिलकी आणि समाजात जिव्हाळा निर्माण होऊन सबंध मानवतेला प्रेमाची आपलेपणाची प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेऊन मा. शेख सुभान अली सर यांच्या उपस्थितीत तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन बारामती सोशल चॕरीटेबल फाउंडेशन तर्फे आयोजन करण्यात आले होते .

बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशन कडून मा. शेख सुभान अली सरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील शोषित, पीडित, वंचित बांधव, अनाथ मुले, निराधार आणि विधवा आई-बहिणी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब यांच्यासोबत ईद साजरी करत आहेत. दरवर्षीच्या कार्यक्रमात शिरखुर्माची मेजवाणी बरोबरच गरजूंना कपडे भेट देण्यात येतात.

आपले संबोधित भाषण करताना मा. शेख सुभान अली सर यांनी सर्वप्रथम उपस्थित समाज बांधवांची, आई-बहिणींची माफी मागितली की आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास खूप उशीर झाला. आम्ही आजपर्यंत अनेक ईद तुमच्याशिवाय, तुम्हाला सोडून साजऱ्या केल्या. इस्लाम शिकवितो की पृथ्वीतलावरील सर्व मानव एकच आहेत, भाऊ-भाऊ आहेत. अल्लाह हा सर्व जगाचा पालनहार आहे, फक्त मुस्लिमांचा नव्हे, मुहम्मद पैगंबर स.स. हे संपूर्ण जगासाठी कृपावंत आहेत, फक्त मुस्लिमांसाठी नव्हे. भारतात 20 कोटी मुस्लिम असून कोणी भाऊ-बहिण जर उपाशीपोटी झोपत असेल तर आम्ही मुस्लिम होऊच नाही शकत. सर्व बहुजन बांधवांत एकोपा, प्रेम आणि बंधुभाव वृद्धिंगत करणे, सांप्रदायिक सदभाव आणि सलोखा वाढविणे, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता अबाधित राखणे, देशसेवा आणि मानव सेवेस समर्पित युवा पिढी तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की बहुजन युवकांनी काही राजकारण्यांच्या मानवता विरोधी, देशविरोधी मानसिकतेला बळी पडू नये आणि आपण सर्व मानव सेवेसाठी या जगात आलो आहे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण एकत्र येऊन आपले सामाजिक , शैक्षणिक , आर्थिक धोरणांबाबत मार्गदर्शन घेणे येणाऱ्या काळात खुप गरजेचे आहे असे सांगितले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन लोणी भापकर गावातील बौद्ध समाज मंदिर , मांतग समाज मंदिर , चोपडे वस्ती ( धनगर वाडा ) या तिनही ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाला बहुसंख्य जेष्ठ नागरिक, तरूण , माता भगिनी महीला , विद्यार्थी, लहान मुले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शेख सुभान अली सर , सचिव महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , महाराष्ट्र , National News channel News18 चे पत्रकार मा. जमीरभाई खान तसेच लोणी भापकर गावचे सरपंच मा.‌ रविकाका भापकर , माजी सरपंच मा. विजय बारवकर , पोलिस पाटील मा. संजय गोंलाडे , मा. गोविंद भापकर , पत्रकार मा. विजय गोलांडे , मा. नवनाथ भापकर , मा. अविनाश बनसोडे , मा. पदम कडाळे , मा. चेतन मोरे , मा. बापू कडाळे , मा. नितीन सकाटे , मा.संदीप कडाळे , मा. महादेव चोपडसर , मा.प्रदिप गोंलाडे , मा. भिमराव पवार, मा. विजय यादव , सचिन भोईटे , फारुक काझी , मुबीन आत्तार , मोहसीन काझी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. एजाजभाई आत्तार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मुनीरभाई तांबोळी यांनी केले तसेच मुहम्मद पैगंबर सर्वासाठी अभियान २०२२ बाबत माहिती सांगितली व मौजे लोणी भापकर गावचे माजी सरपंच मा. विजय बारवकर यांनी सर्वांचे आभार मानले ..

मुहम्मद पैगंबर सर्वासाठी अभियान २०२२ अंतर्गत ईद मिलन कार्यक्रम आयोजक – बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशनचे मार्गदर्शक तसेच शाहू , फुले, आंबेडकर अभ्यासक मा. मुनीरभाई तांबोळी अध्यक्ष – तांबोळी जमात , बारामती शहर , बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जहीरभाई पठाण , सदस्य एजाजभाई आत्तार , सचिन भोईटे , फारुक काझी , मुबीन आत्तार , मोहसीन काझी यांचा मौजे लोणी भापकर गावचे सरपंच मा. रविकाका भापकर तसेच समस्त ग्रामस्थांतर्फे भव्य सत्कार करण्यात आला तसेच उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले ….

गावातील ईद मिलनच्या कार्यक्रमावेळी गावात खूप उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते असे सामाजिक बांधिलकी निर्माण करणारे कार्यक्रम , अभियान वेळोवेळी प्रत्येक समाजात साजरे व्हावे असे कौतुकास्पद उदगार मौजे लोणी भापकर गावातील ग्रामस्थांकडून करण्यात आले सर्व गावात तसेच तालुक्यात मुहम्मद पैगंबर ( स. ) अभियान २०२२ अंतर्गत बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशन आयोजित ईद मिलन कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे ….

बारामती सोशल चॕरीटेबल फाऊंडेशन कडून येणाऱ्या काळात प्रत्येक वेळी सामाजिक एकात्मकता व राष्ट्रीय एकात्मता सशक्त करून मानव सेवेसाठी आदर्श समाज निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!