बारामती तालुक्यातील वन्य जीवांसाठी पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी
परिसरात बिबटे, कोल्हे ,तरस हरींन,व मोर, गरुड,घार आदी वन्य पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे.

बारामती तालुक्यातील वन्य जीवांसाठी पाणवठ्यामध्ये टँकरद्वारे पाणी
परिसरात बिबटे, कोल्हे ,तरस हरींन,व मोर, गरुड,घार आदी वन्य पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील विविध वनपरिक्षेत्र मध्ये वन्य जीवांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर वन विभाग व विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून वनविभागाच्या कृत्रिम पाणवठ्यामध्ये वन्य जीवांची तहान भागविण्यासाठी टँकरद्वारे पाणी सोडण्याचा उपक्रम सोमवार दि.०९ मार्च रोजी सुरू करण्यात आला.
या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती चे वनपाल संतोष उंडे,जहिर शेख, शीतल बागल, वनरक्षक बाळासो गोलांडे, दयानंद अवघडे व कर्मचारी, विविध भागांतील स्थानिक ग्रामस्थ उपस्तीत होते.
उंडवडी कप, जराडवाडी, कण्हेरी, तांदूळवाडी ,काटेवाडी, गोजूबावी, कऱ्हावागज, पारवडी ,गाडीखेल, शिरसुफळ, साबळेवाडी, मुढाळे पंणदरे, कोऱ्हाळे बु, सोनकसवाडी, वाघळवाडी, चौधरवाडी, दंडवाडी, सस्तेवाडी, सदोबाचीवाडी ,काळ खैरवाडी, मोरगाव ,सोनवडी सुपे आदी भागात वन विभागाने पाणवठे तयार केले असून या मध्ये टँकरद्वारे त्यामध्ये पाणी सोडले गेले.
या परिसरात बिबटे, कोल्हे ,तरस हरींन,व मोर, गरुड,घार आदी वन्य पशुपक्ष्यांचे वास्तव्य आहे. हिवाळ्यानंतर येथील झरे अटतात उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते पाण्याअभावी वन्यजीव यांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्त्याकडे धाव घेतात व त्यांच्यावर कुत्र्यांची हल्ले होण्याचा घटनाही घडतात.
आता कृत्रिम पाणवठ्या मध्ये पाणी सोडल्याने वन्य जीवाची तहान भागणार आहे.
विविध भागांतील सेवाभावी संस्था, संघटना,मंडळे यांनी सुद्धा सामाजिक कार्यात सहभागी होऊन वन्य जीवांची तहान भागविणे कामी योगदान द्यावे असे आवाहान वनपरिक्षेत्र अधिकारी अश्र्विनी शिंदे यांनी सांगितले.






