बारामती तालुक्यातील वाघेश्वर संस्थेचे अध्यक्षपदी शहाजी गावडे तर उपाध्यक्ष पदी प्रल्हाद वरे
दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही फाॅर्म न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध

बारामती तालुक्यातील वाघेश्वर संस्थेचे अध्यक्षपदी शहाजी गावडे तर उपाध्यक्ष पदी प्रल्हाद वरे
दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही फाॅर्म न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध
बारामती वार्तापत्र
मंगळवार दिनांक २९/०४/२०२५ रोजी श्री वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मळद , ता-बारामती, जिल्हा-पुणे या संस्थेच्या चेअरमन व व्हाॅइस चेअरमन या पदाकरीता निवडणूक पार पडली.
सदरच्या निवडणूकीसाठी चेअरमन पदी श्री शहाजी जिजाबा गावडे व व्हाॅइस चेअरमन पदी कृषिभूषण श्री प्रल्हाद गुलाबराव वरे या दोघांचेच फाॅर्म आल्याने व त्या दोघांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही फाॅर्म न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाली असे निवडणूक निर्णय अधिकारी श्री अमर गायकवाड सो (कनिष्ठ लिपीक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बारामती) यांनी जाहीर केले.
श्री वाघेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मळद , ता-बारामती, जिल्हा-पुणे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सुद्धा बिनविरोध झालेली होती. चेअरमन, व्हाॅइस चेअरमन निवडणुकीसाठी संस्थेचे खालील सर्व सदस्य उपस्थित होते.
श्री शहाजी जिजाबा गावडे, कृषिभूषण श्री प्रल्हाद गुलाबराव वरे, श्री निवृत्ती आप्पाजी गावडे, श्री सुरेंद्र भानुदास चव्हाण, श्री विजय दादासो गावडे, श्री हेमंत विठ्ठल गावडे, श्री विकास मोहन गावडे, श्री चारुदत्त बाळासाहेब गावडे, श्री सावता नामदेव मोहोळकर (इतर मागास प्रवर्ग) श्री राजेंद्र उत्तमराव मदने (भटक्या जमाती), श्री दयानंद संभाजी लोंढे (अनुसूचित जाती), श्रीमती प्रतिमा प्रतापराव गावडे (महिला प्रवर्ग), सौ पुष्पलता बबनराव शेंडे (महिला प्रवर्ग) यावेळी संस्थेचे सचीव अनिल शिंदे, सहसचीव प्रदीप गावडे इत्यादी उपस्थित होते.