स्थानिक

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी अतिदाबामुळे फुटली लाखो लिटर पाणी वायाला 

शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी अतिदाबामुळे फुटली लाखो लिटर पाणी वायाला 

शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करुन भरपाई देण्यात येणार

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील (म्हेत्रेवस्ती) शिरसाई कालव्याला जाणारी जलवाहिनी अतिदाबामुळे आज सकाळी ९ वाजता फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच; परंतु याचा फटका येथील शेतक-यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. घरात आणि शेतात पाणी शिरल्याने शेतक-यांच्या मोठे नुकसान झाले आहे.
दोन दिवस या भागात पाऊस पडत असल्याने अगोदरच शेतात पाणी, त्यात ही जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. शेतक-यांचे झालेल्या नुकसानाला कोण जबाबदार? असा सवाल येथील शेतकरी उपस्थित करत आहेत. अचानक आलेल्या पाण्याने शेतक-यांची धांदल उडाली.

घरातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

शिरसाई कालव्याची शिर्सुफळ येथील रेल्वेलाईनजवळ जलवाहिनी फुटल्याने मोठा आवाज झाला. ही घटना लोकवस्तीपासून दूर असल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु शेतक-यांनी केलेला मोरघास, जनावरांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले. काही शेतक-यांच्या शेळ्या आणि कोंबड्या यात वाहून गेल्या आहेत. रस्त्याकडेला असलेल्या चारचाकी वाहनात पाणी शिरल्याने गाड्या बंद पडल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले असून याला जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी असल्याचे मत येथील शेतकरी अतुल हिवरकर, संजय बोराटे, माजी सरपंच राजू शेख, बाबू म्हेत्रे, बाबू शिंदे, महादेव म्हेत्रे, तुषार शिंदे, भरत हिवरकर यांनी व्‍यक्‍त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!