इंदापूर

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे जवान लक्ष्मण डोईफोडे आसाम मध्ये कर्तव्य बजावताना शहीद

बोराटवाडीसह इंदापूर तालुक्यावर पसरली शोककळा

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे जवान लक्ष्मण डोईफोडे आसाम मध्ये कर्तव्य बजावताना शहीद

बोराटवाडीसह इंदापूर तालुक्यावर पसरली शोककळा

इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे बोराटवाडी गावचे लक्ष्मण सतू डोईफोडे ( वय ४५ वर्षे ) हे आसाम राज्यात कर्तव्यावर असताना दि.२३ फेब्रुवारी रोजी शहीद झाले आहेत.

सुभेदार लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी ड्युटीवर होते. गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली यामध्ये त्यांना वीरमरण आले आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शुक्रवार दि.२६ रोजी बोराटवाडी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Check Also
Close
Back to top button